अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुला अटक

By Admin | Published: February 28, 2017 09:33 PM2017-02-28T21:33:15+5:302017-02-28T21:33:15+5:30

अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी ख्रिश्चन धर्मगुरुला अटक केली आहे. रॉबिन वडक्कनचेरिल (49) असे आरोपीचे नाव आहे.

Christian religious leader arrested for raping a minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुला अटक

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
थिरुअनंतपुरम, दि. 28 - अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी ख्रिश्चन धर्मगुरुला अटक केली आहे. रॉबिन वडक्कनचेरिल (49) असे आरोपीचे नाव आहे. 
रॉबिन वडक्कनचेरिल याला पोलिसांनी पॉस्को कायद्यातर्गंत अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. 
कन्नूर जिल्ह्यातील कोत्तियूर येथे या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने एका हॉस्पिटलमध्ये 7 फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीची चौकशी केली असता तिने येथील सेंट सेबेस्टियंस चर्चमध्ये असणा-या ख्रिश्चन धर्मगुरु रॉबिन वडक्कनचेरिलने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.  
 

 

Web Title: Christian religious leader arrested for raping a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.