ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद

By महेश गलांडे | Published: November 7, 2020 04:00 PM2020-11-07T16:00:34+5:302020-11-07T16:01:48+5:30

कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अर्णबची सुटका करा आणि लोकशाहीला वाचवा, असे म्हटलं आहे. कंगना आणि शिवसेना नेत्यांचा वाद चांगलाच रंगला होता

China has the biggest advantage of not having Trump in power, Kangana said | ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद

ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद

Next
ठळक मुद्देकंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अर्णबची सुटका करा आणि लोकशाहीला वाचवा, असे म्हटलं आहे. कंगना आणि शिवसेना नेत्यांचा वाद चांगलाच रंगला होता.

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. अर्णब आणि माझी लढाई ही आमच्या दोघांची नसून राष्ट्रवादाची असल्याचं कंगनानं म्हटलं आहे. अर्णबची सुटका करा आणि लोकशाहीला वाचवा, असा हॅशटॅगही कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिला आहे. अन्वय नाईकप्रकरणी संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आज अर्णब यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यातच, अर्णबच्या सुटकेची मागणी अभिनेत्री कंगना राणौतने केली आहे.   

कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अर्णबची सुटका करा आणि लोकशाहीला वाचवा, असे म्हटलं आहे. कंगना आणि शिवसेना नेत्यांचा वाद चांगलाच रंगला होता. सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन कंगना आणि शिवसेनेतील वादावरुन रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांनीही वार्तांकन केले होते. त्यामुळे, कंगनानेही अर्णब यांच्या समर्थनार्थ आपली बाजू मांडताना ही राष्ट्रवादाची लढाई असल्याचं म्हटलं आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवावरही कंगनाने भाष्य केलंय.  

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या समर्थकांना संबोधित करताना, राष्ट्राध्यक्ष होताच आपण कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कठोर नियम लागू करणार आहोत, असे संकेत दिले आहेत. सध्या अमेरिकेतील निवडणुकांचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, ट्रम्प यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने राष्ट्रवादाबद्दल बोलताना ट्रम्प यांचं कौतुक केलंय. ट्रम्प यांच्यात कितीही  वाईटपणा असेल, पण एक गोष्ट सत्य आहे ती म्हणजे, ते चायनीज व्हायरला चायनीज व्हायरस असेच म्हणतात. रेडिकल्स इस्लामिक दहशतवादाला असे नाहीत म्हणत की, दहशतवादाचा कुठलाही धर्म नसतो. त्यामुळे, ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला होईल, जो देश दहशतवादाचा प्रसार करतो, त्या देशालाच फायदा होईल, असेही कंगनाने म्हटले आहे. 

कंगनाने अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर ही लढाई राष्ट्रवादाची असल्याचं म्हटलं आहे. ही लढाई फक्त माझी किंवा अर्णब यांची नसून सभ्यता आणि भारतवर्षाची आहे, असे कंगनाने म्हटलं आहे. माझे काही चित्रपट हीट झाले होते, त्यानंतर काही जणांनी एकत्र येऊन माझ्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रोडक्शन हाऊसने मला बॅनही केले. मात्र, मी माझ्या स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून चित्रपटांची निर्मिती सुरूच ठेवली. त्यामुळे, माझा राष्ट्रवादाचा आवाज दाबण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले. सध्या अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे, तेव्हा पत्रकार पुढे येत नाहीत. हायकोर्टानेही अर्णब यांची अटक चुकीचं असल्याचं म्हटलंय, पण तरीही कुणी अर्णब यांच्या बाजुने आवाज उठवत असल्याचं कंगनानं म्हटलं आहे. कंगनानं ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर करत, आपलं मत मांडलं आहे. 
 

Web Title: China has the biggest advantage of not having Trump in power, Kangana said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.