‘जेईई-मेन’च्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी नाेंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 09:43 AM2021-07-16T09:43:11+5:302021-07-16T09:43:21+5:30

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.

Changes in test dates for the fourth phase of ‘JEE-Main’; So far 7.32 lakh students have registered | ‘जेईई-मेन’च्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी नाेंदणी

‘जेईई-मेन’च्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी नाेंदणी

Next

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा ‘जेईई-मेन’च्या चवथ्या टप्प्यातील तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २७ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत चवथ्या टप्प्यातील परीक्षा हाेणार हाेती. आता ही परीक्षा २६, २७, ३१ ऑगस्ट आणि १ व २ सप्टेंबर २०२१ या तारखांना हाेणार आहे. 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. ही परीक्षा महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना तयारीसाठी चार आठवड्यांचा कालावधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तशी शिफारस राष्ट्रीय तपासणी संस्थेने केली हाेती. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा पूर्वनियाेजित वेळापत्रकानुसारच हाेणार आहे.  चौथ्या टप्प्यासाठी आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. नाेंदणीसाठी अंतिम मुदत २० जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Web Title: Changes in test dates for the fourth phase of ‘JEE-Main’; So far 7.32 lakh students have registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.