राजीव कोचरसह तिघांची सीबीआयने केली चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:51 AM2018-04-09T01:51:16+5:302018-04-09T01:51:16+5:30

व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या कर्जाच्या प्रकरणावरून सीबीआयने रविवारी आयसीसीआय बँकेच्या एमडी व सीईओ चंदा कोचर यांचा दीर राजीव कोचर आणि न्यूपॉवर रिन्युएबल प्रा.लि.च्या दोन संचालकांची चौकशी केली.

CBI has questioned three persons including Rajiv Kochar | राजीव कोचरसह तिघांची सीबीआयने केली चौकशी

राजीव कोचरसह तिघांची सीबीआयने केली चौकशी

Next

नवी दिल्ली : व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या कर्जाच्या प्रकरणावरून सीबीआयने रविवारी आयसीसीआय बँकेच्या एमडी व सीईओ चंदा कोचर यांचा दीर राजीव कोचर आणि न्यूपॉवर रिन्युएबल प्रा.लि.च्या दोन संचालकांची चौकशी केली. यामध्ये व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांचे निकटवर्ती महेशचंद्र पुगलिया यांच्यासह उमाकांत वेंकट नायक यांचाही समावेश आहे. सीबीआयच्या वांद्रे येथील कार्यालयात या तिघांची चौकशी करण्यात आली. राजीव कोचर यांची सलग चौथ्या दिवशी तर पुगलिया यांची सलग दुसऱ्या दिवशी या प्रकरणात चौकशी झाली आहे. व्हिडीओकॉनला कन्सल्टन्सी सेवा पुरवणाºयांमध्ये कोणत्या प्रकारचा समावेश होता, यावरून नायक यांची पहिल्यांदाच चौकशी करण्यात आली आहे. नायक हे पूर्वी व्हिडीओकॉनचे कर्मचारीही होते. कर्ज पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेतील राजीव यांच्या सिंगापूर येथील अविस्ता अ‍ॅडव्हायजरी कंपनीच्या भूमिकेबद्दलही नायक आणि पुगलिया यांना विचारणा करण्यात आली.

Web Title: CBI has questioned three persons including Rajiv Kochar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.