अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरेल - मोदींना आशा

By admin | Published: April 20, 2015 09:28 AM2015-04-20T09:28:15+5:302015-04-20T11:54:20+5:30

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होणार असून हे अधिवेशन फलदायी ठरेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.

Budget session will be fruitful - Modi's hope will be fruitful | अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरेल - मोदींना आशा

अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरेल - मोदींना आशा

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होणार असून हे अधिवेशन फलदायी ठरेल  अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. या अधिवेशनात विविध विषयांवरील चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे ट्विट मोदी यांनी केले आहे. 
संसदेच्या सुटीनंतर उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून पुन्हा सुरू होत असून वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून पुन्हा एकदा रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. या विधेयकावरून सरकारला घेरण्याची विरोधकांनी पूर्ण तयारी केली आहे. काँग्रेसने रविवारी या कायद्याच्या विरोधात शेतकरी व शेतमजुरांची विराट रॅली आयोजित करून सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले. भूसंपादन विधेयकाशिवाय अन्य महत्वाच्या विधेयकांवरही निर्णय होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Budget session will be fruitful - Modi's hope will be fruitful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.