वडनगरीला मुलाने मोडला बापाचा पाय

By admin | Published: August 14, 2016 01:08 AM2016-08-14T01:08:20+5:302016-08-14T01:08:20+5:30

जळगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मुलाने बापाला काठीने मारहाण करीत त्याचा पाय मोडल्याची घटना वडनगरी (ता.जळगाव) येथे १२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १३ रोजी तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

The boy had broken his head and the boy's legs broke | वडनगरीला मुलाने मोडला बापाचा पाय

वडनगरीला मुलाने मोडला बापाचा पाय

Next
गाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मुलाने बापाला काठीने मारहाण करीत त्याचा पाय मोडल्याची घटना वडनगरी (ता.जळगाव) येथे १२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १३ रोजी तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वडनगरी येथील प्रमोद प्रताप सोनवणे याने त्याच्या आईकडून १०० रुपये मागितले. मात्र, पैसे न मिळाल्याने त्याने घरातील भांडी विकायला काढली. याच कारणावरून प्रमोदचा त्याचे वडील प्रताप लोटू सोनवणे (वय ५६) यांच्याशी भांडण झाले. त्यात त्याने वडिलांचा पाय मोडला. याप्रकरणी प्रताप सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोदविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२५, ५०४, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल संजय चौधरी करीत आहेत.

Web Title: The boy had broken his head and the boy's legs broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.