'पप्पू'नंतर भाजपाची दुसरी जाहिरातही वादाच्या भोव-यात, निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 03:19 PM2017-11-18T15:19:33+5:302017-11-18T15:23:51+5:30

गुजरातमध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियावर जोरदार प्रचारमोहिम सुरु केली आहे. रोज नवनवे व्हिडीओ पोस्ट करत विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. दरम्यान भाजपाच्या एका प्रचार व्हिडीओवरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे

The BJP's second advertisement after 'Pappu' is a complaint against the Election Commission | 'पप्पू'नंतर भाजपाची दुसरी जाहिरातही वादाच्या भोव-यात, निवडणूक आयोगाकडे तक्रार

'पप्पू'नंतर भाजपाची दुसरी जाहिरातही वादाच्या भोव-यात, निवडणूक आयोगाकडे तक्रार

Next
ठळक मुद्देभाजपाच्या नव्या प्रचार व्हिडीओवरुन राज्यात वाद निर्माण झाला आहेहमदाबादचे वकिल गोविंद परमार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहेव्हिडीओ मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवत असून मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी जारी करण्यात आल्याचा आरोप

अहमदाबाद - गुजरातमध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियावर जोरदार प्रचारमोहिम सुरु केली आहे. रोज नवनवे व्हिडीओ पोस्ट करत विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. दरम्यान भाजपाच्या एका प्रचार व्हिडीओवरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओविरोधात अहमदाबादचे वकिल गोविंद परमार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 

गोविंद परमार यांनी हा व्हिडीओ समाजात तेढ आणि दुरावा निर्माण करणारा असल्याचा आरोप केला आहे. सोबतच मतदारांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या जाहिरातीची सुरुवात अजानने होते. यावेळी एक तरुणी घाईघाईत निर्मनुष्य रस्त्यावरुन चालताना दाखवण्यात आलं आहे. दुसरीकडे तरुणीचे कुटुंबिय मुलगी घरी का नाही आली म्हणून चिंतेत दाखवले आहेत. 

मुलगी घरी पोहोचल्यानंतर कुटुंबिय सुटकेचा निश्वास सोडतात आणि तिला मिठी मारताना दाखवण्यात आलं आहे. यानंतर मुलीची आई कॅमे-यात पाहते आणि विचारते की, 'हे गुजरातमध्ये होतंय याचं तुम्हाला आश्चर्य वाटतंय का ?' यानंतर तिचे वडिल म्हणतात की, 'गुजरातमध्ये 22 वर्षांपुर्वी ही परिस्थिती होती. आणि जर ते पुन्हा सत्तेत आले तर हे होऊ शकतं'.

व्हिडीओचा शेवट 'अपना वोट, अपनी सुरक्षा' असं सांगत होतं. दरम्यान निवडणूक आयोगाकडे तक्रार करणा-यांनी दावा केला आहे की, हा व्हिडीओ मुस्लिमांच्या भावनांना ठेस पोहोचवणारा आहे. 'या व्हिडीओतून बहुसंख्यांक समाजाच्या मनात मुस्लिमांबद्दल भीती असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवत असून मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी जारी करण्यात आला आहे', असं गोविंद परमार यांनी म्हटलं आहे. 

याआधीही भाजपाने आपल्या जाहिरातीत पप्पू शब्दाचा वापर केल्याने निवडणूक आयोगाने खडे बोल सुनावले होते. एका विशेष व्यक्तीचा अपमान करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आल्याचं सांगत निवडणूक आयोगाने जाहिरातीवर बंदी आणली होती. 
 

Web Title: The BJP's second advertisement after 'Pappu' is a complaint against the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.