महाराष्ट्रासह पाच राज्यांत भाजपा जाणार घरोघरी, महिला मोर्चाची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 04:53 AM2018-07-29T04:53:20+5:302018-07-29T04:53:32+5:30

महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती अंतिम टप्प्यात असल्याचे लक्षात घेऊन भाजपाने पर्यायी रणनीतीची हाती घेत महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी तीनदा भेटीची योजना आखली आहे.

 BJP will host house in five states including Maharashtra, campaign for women's movement | महाराष्ट्रासह पाच राज्यांत भाजपा जाणार घरोघरी, महिला मोर्चाची मोहीम

महाराष्ट्रासह पाच राज्यांत भाजपा जाणार घरोघरी, महिला मोर्चाची मोहीम

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती अंतिम टप्प्यात असल्याचे लक्षात घेऊन भाजपाने पर्यायी रणनीतीची हाती घेत महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी तीनदा भेटीची योजना आखली आहे. महिला मोर्चाकडे ही जबाबदारी सोपविली आहे.
वॉर्ड स्तरावर ज्या घरांना भेटी दिल्या आहेत त्याची यादी तयार करण्यास सांगितले आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले की, ५० दिवसांत ३७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा दौरा करून, अहवाल सोपवावा. येत्या निवडणुकीत भाजपाला महिला मोर्चाच्या प्रयत्नातून मिळणारी मते दिसायला हवीत. त्यासाठी महिला मोर्चाने प्रत्येक घरात तीनदा भेट द्यावी. महिलेला पटवून एका कुटुंबातून ४ ते ५ मते मिळू शकतील, असे गणित आहे.

Web Title:  BJP will host house in five states including Maharashtra, campaign for women's movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा