पोलीस Vs सीबीआय: सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सुटका; ममता बॅनर्जींचे आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 08:29 PM2019-02-03T20:29:31+5:302019-02-04T09:47:51+5:30

शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे झाले आहे.

BJP is torturing Bengal; Mamata Banerjee's allegation on CBI's move | पोलीस Vs सीबीआय: सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सुटका; ममता बॅनर्जींचे आंदोलन सुरु

पोलीस Vs सीबीआय: सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सुटका; ममता बॅनर्जींचे आंदोलन सुरु

Next

कोलकाता : शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे झाले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा पश्चिम बंगाल सरकारचा छळ करत आहे. बंगालला नष्ट करण्याचे मनसुबे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सोडले असून ममता बॅनर्जी यांनी मेट्रो सिनेमासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. 



 

 कोलकाता येथील सीबीआयच्या प्रादेशिक कार्यालयासमोरील पोलीस फौजफाटा काढून घेण्यात आला असून सीआरपीएफच्या जवानांनी या ठिकाणाचा ताबा घेतला आहे. 



 





बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने घेतलेली ब्रिगेड रॅली पाहून भाजपा घाबरली आहे. यामुळे बंगालच्या नागरिकांना छळण्याचे काम ते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वापरलेली भाषा तुम्ही ऐकली असेल, असा आरोप ममता यांनी केला.



 

पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 




कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार हे जगातील चांगल्या लोकांपैकी एक आहेत, हे मी आताही सांगणार. राज्याच्या पोलिस दलाच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर असल्याचा अभिमान आहे. कोणतीही परवानगी न घेता, नोटीस न पाठवता सीबीआयचे अधिकारी पोलिस आयुक्तांच्या घरात प्रवेश कसे करू शकतात. आम्ही सीबीआयच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक करू शकतो. मात्र, त्यांना केवळ ताब्यात घेतले आहे. काहीही झाले तरीही आपण पोलिसांच्या बाजुने राहणार. लोकशाहीच्या ढाच्याला धक्का दिल्याबद्दल मला वाईट वाटत आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 


 



 

तर या कारवाईवरून भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांचे सरकार परवानगी नाकारत आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रकार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडला आहे. भाजपा या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे, असे त्यांनी म्हटले.


 

सीबीआय अधिकाऱ्यांना शेक्सपीअर सरानी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याप्रकरणी सीबीआयचे अंतरिम प्रमुख एम नागेश्वर राव यांनी कायदेतज्ज्ञांना पाचारण केले असून त्यांच्या सुचनेनुसारच पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगितले. 


Web Title: BJP is torturing Bengal; Mamata Banerjee's allegation on CBI's move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.