पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:39 PM2019-02-03T19:39:34+5:302019-02-04T09:49:03+5:30

गेल्या काही दिवसांपासून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून नकार दिला आहे. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Kolkata Police detains the CBI team; central and west Bengal will fight | पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Next

कोलकाता : काही महिन्यांपूर्वीच आंध्र प्रदेश सरकारसह प. बंगालमध्ये परवानगीशिवाय सीबीआय अधिकाऱ्यांना छापेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. आज कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आणखी चिघळणार आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महापौर फिरहाद हकीम दाखल झाले असून चर्चा सुरु आहे. 

 
गेल्या काही दिवसांपासून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून नकार दिला आहे. अमित शहा यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास मनाई केल्यानंतर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही परवानगी नाकारण्यात आली. शेवटी योगी यांनी फोनवरून भाषण द्यावे लागले. 




सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी नेले...
सीबीआय ही केंद्र सरकारच्या अखत्यारितील तपास यंत्रणा आहे. दिल्लीत तपास करण्यासाठी किंवा छापे मारण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते. मात्र, अन्य राज्यांमध्ये तपास करण्यासाठी 'सर्वसाधारण सहमती' आवश्यक असते. राज्यांनी काही दशकांपूर्वी ही संमती दिली होती. मात्र, केंद्र सरकारकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या अधिकारातील राज्यांमध्ये सीबीआयला दिलेले पत्र मागे घेतले आहे. यामुळे प. बंगालमध्ये कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी छापा मारण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले आहे. 






 

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या कार्यालयाला वेढा घातला असून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


 

संबंधित बातमीसाठी चंद्राबाबू अन् ममतां दीदींचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्र, बंगालबंदी

पश्चिम बंगाल सरकारनं अमित शहांनंतर योगी आदित्यनाथांच्या रॅलीला परवानगी नाकारली



 

Web Title: Kolkata Police detains the CBI team; central and west Bengal will fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.