पराभवातून भाजपाने धडा घ्यावा -अनुप्रिया पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:50 AM2018-12-28T05:50:18+5:302018-12-28T05:50:45+5:30

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) लहान घटक पक्षांकडे भाजपा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपना दल (एस) या पक्षाच्या नेत्या व केंद्रीय आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केला आहे.

 BJP should take lessons from defeat: Anupriya Patel | पराभवातून भाजपाने धडा घ्यावा -अनुप्रिया पटेल

पराभवातून भाजपाने धडा घ्यावा -अनुप्रिया पटेल

Next

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) लहान घटक पक्षांकडे भाजपा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपना दल (एस) या पक्षाच्या नेत्या व केंद्रीय आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केला आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकांतल्या पराभवापासून भाजपाने धडा घ्यावा, असा इशाराही त्यांनी दिला.
बिहारमधील लोकसभा जागावाटपात भाजपा अन्याय करीत असल्याची तक्रार करीत राष्ट्रीय लोक समता पार्टीचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएला रामराम केला होता. त्यानंतर ते यूपीएमध्ये सामील झाले होते. आता अपना दल (एस) ही भाजपावर टीका करीत आहे. या पक्षाचे अध्यक्ष आशिष पटेल मंगळवारी म्हणाले होते की, २०१९ साली लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला विजय मिळून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये आपल्या घटक पक्षांची भाजपाने नीट काळजी घ्यायला हवी. तसे न केल्यास तीन राज्यांची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशमध्येही होऊ शकते.

अपना दल (एस)ची राजकीय ताकद

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अपना दल (एस)ने लढविलेल्या दोन जागांपैकी मिर्झापूर येथून अनुप्रिया पटेल व प्रतापगढमधून या पक्षाचे आणखी एक उमेदवार हरिवंश सिंह निवडून आले होते. राज्याच्या विधानसभेत या पक्षाचे नऊ आमदार आहेत.

Web Title:  BJP should take lessons from defeat: Anupriya Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.