भाजपाला धक्का : आसाम सरकारमधून ‘अगप’ बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:39 AM2019-01-08T05:39:49+5:302019-01-08T05:40:22+5:30

नागरिकत्व विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत

BJP shocks: 'AGP' out of Assam government | भाजपाला धक्का : आसाम सरकारमधून ‘अगप’ बाहेर

भाजपाला धक्का : आसाम सरकारमधून ‘अगप’ बाहेर

Next

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाम गण परिषदने (अगप) आम्ही आसाममधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधून (रालोआ) बाहेर पडत असल्याची घोषणा सोमवारी केली. हे नियोजित विधेयक मागे घ्यावे हे सरकारला पटवून देण्यात अगपने निर्वाणीचे केलेले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर थेट सरकारमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय परिषदेने घेतला.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची येथे भेट घेतल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा म्हणाले की, हे विधेयक आसाम कराराच्याविरोधात आहे आणि सध्या सुरू असलेले नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) अद्ययावत करण्याचे काम वाया जाईल हे केंद्र सरकारला पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, राजनाथ सिंह यांनी आम्हाला हे विधेयक उद्या लोकसभेत संमत होईल हे स्पष्टपणे सांगितले आहे. यानंतर आघाडीमध्ये राहण्याचा कोणताच प्रश्न उरला नाही, असे ते म्हणाले. १२६ सदस्यांच्या राज्य विधानसभेत भाजपाचे ६१ आमदार असून बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या १२ आमदारांचा व एकमेव अपक्ष आमदाराचा आघाडीला पाठिंबा आहे. अगपचे १४ आमदार आहेत. अतुल बोरा यांच्यासह तीन मंत्री आहेत.

आज सभागृहात चर्चा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ तयार झाले आहे. त्यावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सोमवारी मांडण्यात
आला. या विधेयकावर मंगळवारी सभागृहात चर्चा होणे अपेक्षित आहे. धार्मिकतेच्या आधारावर भारतीय नागरिकत्व देणे ही राज्यघटनाविरोधी व चुकीची कृती आहे, असे मत या समितीने बहुमताने व्यक्त केले आहे.

काय आहे प्रकरण?
च्अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चनधर्मीय स्थलांतरित होऊन भारतात आले आहेत आणि त्यांच्या वास्तव्याला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, अशांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.

च्आतापर्यंत हा वास्तव्याचा कालावधी १२ वर्षांचा धरण्यात येतो. तो कमी करून व अशा लोकांकडे पुरेशी कागदपत्रे नसतानाही त्यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसे आश्वासन भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते.

ईशान्य भारतात आज बंद
गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ च्या निषेधार्थ ईशान्य भारताच्या सातही राज्यांतील अनेक विद्यार्थी संघटनांनी उद्या, मंगळवारी बंद पुकारला आहे.

मिझो झिरलाई पवाल (एमझेडपी), दी आॅल अरुणाचल प्रदेश स्टुडंटस् युनियन (आपसू), नागा स्टुडंटस् फेडरेशन, आॅल आसाम स्टुंडटस् युनियन (आसू) यांनी ११ तासांचा बंद पाळण्याचे ठरविले आहे.

Web Title: BJP shocks: 'AGP' out of Assam government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.