Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 10:19 PM2018-08-13T22:19:09+5:302018-08-13T22:28:36+5:30

राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी अनेकदा केला आहे

BJP releases Rafale Deal for Dummies video starring Pallavi Joshi | Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार

Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार

Next

मुंबई: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अनेकदा राफेल खरेदीवरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे 'स्वच्छ कारभारा'चा दावा करणारं मोदी सरकार अडचणीत आलं आहे. यामधून सरकारची सुटका करण्यासाठी आता मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी सरसावली आहे. 

काही दिवसांपूर्वीच 'ग्रहण' मालिकेत दिसलेली अभिनेत्री पल्लवी जोशी आता मोदी सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचं ग्रहण दूर करण्यासाठी पुढे आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये पल्लवी जोशी राफेल डील सोप्या शब्दांमध्ये सांगताना दिसत आहेत. यासाठी तिनं सोसायटीच्या सिक्युरिटी सिस्टीमचं उदाहरण दिलं आहे. 'सोसायटीच्या सिक्युरिटी सिस्टमसाठी आधीच्या सचिवांनी फ्रेंच कंपनीशी बोलणी केली होती. 10 वर्षांपासून ही बोलणी सुरू होती. या काळात सिक्युरिटी सिस्टिमसाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान जुनं झालं,' असं पल्लवी जोशी या व्हिडीओतून सांगते आहे. 





'आधीच्या सचिवांनी ज्या लॉकसाठी बोलणी केली होती, त्यात सुटे भाग, देखभाल यांचा समावेशच नव्हता. मी सोसायटीची नवीन सचिव असल्यानं थेट फ्रेंच कंपनीच्या प्रमुखांशी बोलणी केली. मी त्यांच्याशी नवा करार केला. यामधून अनेक अनुकूल गोष्टी घडल्या. नव्या सुविधा मिळाल्या. विशेष म्हणजे यातील काही लॉक भारतात तयार केली जाणार होती,' असं सांगत पल्लवी जोशीनं राफेल करार आणि मेक इन इंडियाचं महत्त्वदेखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार आधीच्या सचिवांपेक्षा कमी किमतीत केल्याचं सांगत काँग्रेसच्या तुलनेत भाजपा सरकारनं जनतेचा पैसा वाचवला, असंही सांगण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे पल्लवीनं केला आहे. या करारामुळे देशाचे 12 हजार 500 कोटी रुपये वाचले, असं जोशींनी व्हिडीओच्या अखेरीस म्हटलं आहे. 

Web Title: BJP releases Rafale Deal for Dummies video starring Pallavi Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.