“फारूक अब्दुल्लांना NDAसोबत सरकार बनवायचे होते, कलम ३७० नंतर...”; BJP नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 08:40 PM2024-02-16T20:40:18+5:302024-02-16T20:40:25+5:30

Farooq Abdullah And BJP Alliance News: या युती प्रक्रियेचा आपण भाग राहिलो आहे, असा दावाही या भाजपा नेत्याने केला आहे.

bjp leader devendra singh rana claims farooq abdullah wanted to form government with bjp | “फारूक अब्दुल्लांना NDAसोबत सरकार बनवायचे होते, कलम ३७० नंतर...”; BJP नेत्याचा दावा

“फारूक अब्दुल्लांना NDAसोबत सरकार बनवायचे होते, कलम ३७० नंतर...”; BJP नेत्याचा दावा

Farooq Abdullah And BJP Alliance News: काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला. जम्मू-काश्मीरमधील नेते फारूक अब्दुल्ला यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता एका भाजपा नेत्याने मोठा दावा केला आहे. सन २०१४ नंतर फारूक अब्दुल्ला यांना भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा होती, असा दावा करण्यात आला आहे. 

भाजपा नेते देवेंद्र सिंह राणा यांनी यासंदर्भातील दावा केला आहे. फारूक अब्दुल्ला सातत्याने भाजपासोबत युती करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर फारूक अब्दुल्ला हे भाजपासोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होते. त्या प्रक्रियेचा मीदेखील एक भाग होतो. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पुन्हा एकदा फारूक अब्दुल्ला यांनी तसा प्रयत्न केला होता, असे देवेंद्र सिंह राणा यांनी म्हटले आहे. 

भाजपाविरोधात राजकारण, पण नरेंद्र मोदींचे कौतुक

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते देवेंद्र सिंह राणा यांनी केलेल्या दाव्यामुळे जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपा-पीडीपी दीर्घकाळापर्यंत युतीत होते. यामुळे भाजपावर अनेकदा आरोपही करण्यात आले आहेत. विरोधक अद्यापही यावरून भाजपावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्स भाजपाविरोधात राजकारण करत आले आहे. मात्र, या पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत, अनेक योजना, निर्णय यांना समर्थन दिले. यामुळे या पक्षाला अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले जाते. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करत इंडिया आघाडीला पहिला धक्का दिला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही इंडिया आघाडीविरोधात जाऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
 

Web Title: bjp leader devendra singh rana claims farooq abdullah wanted to form government with bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.