दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:46 PM2024-02-29T23:46:06+5:302024-02-29T23:48:25+5:30

अंदाजे १०० ते १५० नावांवर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार

bjp cec meeting in delhi smriti irani narendra modi nitin gadkari amit shah among lok sabha candidates final list | दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी?

दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी?

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातील उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याबाबत दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही रात्री अकराच्या सुमारास सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाचे अनेक प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत वेगवेगळ्या राज्यांसाठी स्वतंत्र बैठका सुरू आहेत. या बैठकीनंतरच यादी जाहीर करण्याचे काम सुरू होईल. पुढील दोन दिवसांत १०० ते १५० उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

--

राजकीय जाणकारांच्या मते, वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जवळपास निश्चित आहे. ते तिसऱ्यांदा भाजपच्या चिन्हावर वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. यासोबत गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील गांधी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून भाजपचे उमेदवार असू शकतात. याशिवाय पूर्व मुंबईतून पियुष गोयल, संभवपूर मतदारसंघातून धर्मेंद्र प्रधान आणि हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून अनुराग ठाकूर यांचे तिकीट जवळपास निश्चित मानले जात आहे. यासोबतच यावेळी भाजपा पुन्हा स्मृती इराणी यांना यूपीच्या अमेठी मतदारसंघातून तिकीट देऊ शकते, कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सुमारे ५० हजार मतांनी पराभव केला होता.

भाजपाच्या यादीतील संभाव्य नावे आणि त्यांचे संभाव्य मतदारसंघ

  • वाराणसी- नरेंद्र मोदी
  • गांधी नगर - अमित शहा
  • नागपूर- नितीन गडकरी
  • पूर्व मुंबई- पियुष गोयल
  • संभवपूर- धर्मेंद्र प्रधान
  • हमीरपूर- अनुराग ठाकूर
  • अमेठी - स्मृती इराणी
  • बेगुसराय- गिरीराज सिंह
  • आरा- आर के सिंग
  • भावनगर - मनसुख मडाविया
  • जोधपूर- गजेंद्र सिंह शेखावत
  • अरुणाचल पश्चिम - किरण रिजू
  • सिकंदराबाद- जी के रेड्डी
  • भिवानी- भूपेंद्र यादव
  • गुरुग्राम- राव इंद्रजित सिंग
  • मिर्झापूर- अनुप्रिया पटेल
  • मुझफ्फरनगर - संजीव बल्यान
  • आग्रा- डॉ.एस.पी.सिंग बघेल
  • मोहनलालगंज- कौशल किशोर
  • दिब्रुगड- सर्बानंद सोनेवाल
  • बंडायु- बीएल वर्मा
  • धारवाड- प्रल्हाद जोशी

Web Title: bjp cec meeting in delhi smriti irani narendra modi nitin gadkari amit shah among lok sabha candidates final list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.