BJP Attack On Sharad Pawar: 'दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो, पण...' पवारांच्या बॉलिवूड संदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 04:33 PM2022-10-09T16:33:49+5:302022-10-09T16:35:06+5:30

''दादासाहेब फाळके, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, स्मिता पाटिल, माधुरी दीक्षित आदिंचे काय?" असा प्रश्न भाजपने केला आहे. 

bjp attacks over sharad pawar bollywood muslim contribution statement and asks terrorists have no religion but | BJP Attack On Sharad Pawar: 'दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो, पण...' पवारांच्या बॉलिवूड संदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

BJP Attack On Sharad Pawar: 'दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो, पण...' पवारांच्या बॉलिवूड संदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी बॉलिवूडसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यानंतर, राजकी वातावरण तापले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याचा निषेध करत, व्होट बँकेच्या नावाखाली कला आणि सिनेमाचे विभाजन कशासाठी, असा प्रश्न भाजपने केला आहे. शरद पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना, मुस्लीम अल्पसंख्याकांनी बॉलीवूडमध्ये सर्वाधिक योगदान दिले आहे, असे म्हटले होते. यावर आता भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट करत, ''दादासाहेब फाळके, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, स्मिता पाटिल, माधुरी दीक्षित आदिंचे काय?" असा प्रश्न केला आहे. 

'दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, पण...' -
पुनावाला म्हणाले, ''तर दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, मात्र कला आणि सिनेमाचा धर्म असतो पवार साहेब? पण आपण अशा पक्षाकडून काय अपेक्षा करू शकतो, ज्या पक्षाचा मंत्री नवाब मलिक डी कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. ते आधी देशाला हिंदू-मुस्लीम, असे विभाजित करतात.. मग वर्गात विभाजन करतात.. ते राजस्थानात विजेचेही विभाजन करतात. आता कला/सिनेमा विभाजन करत आहेत. हे अत्यंत दुःखद आहे.'' 

"या विचारामागे काय षडयंत्र आहे?" -
याशिवाय, शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप नेते राम कदम यांनीही अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला, की काय ते इंडस्ट्रीमध्ये यांचे योगदाना नाकारू शकता? कदम म्हणाले, "दादा साहेब फाळके यांनी या इंडस्ट्रीची स्थापना केली. त्यांची व्होट बँकेच्या राजकारणासाठी कला आणि प्रतिभा यांना धर्माच्या नावाखाली विभाजित करण्याची इच्छा होती का?  या विचारामागे काय षडयंत्र आहे?"

काय म्हणाले होते शरद पवार? - 
खरे तर, शरद पवार यांनी दावा केला होता, की बॉलिवूडमध्ये सर्वाधिक योगदान मुस्लीम समाजाचे आहे आणि त्याकडे दूर्लक्ष करता येणार नाही.  ते म्हणाले होते, देशातील सर्वच क्षेत्रात अल्पसंख्याक आणि उर्दू भाषेचे योगदान आहे. एवढेच नाही, तर आज कला असो, लेखन असो किंवा कविता असो, सर्वात मोठे योगदान अल्पसंख्याकांचे आहे आणि ते उर्दू भाषेतून आले आहे. तसेच, बॉलीवूडला शीर्षस्थानी नेण्यात मुस्लीम अल्पसंख्याकांचे योगदान सर्वाधिक आहे.


 

Web Title: bjp attacks over sharad pawar bollywood muslim contribution statement and asks terrorists have no religion but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.