आम आदमी पक्षाला मोठा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडला पक्ष, आता भाजपात जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:22 PM2024-01-18T17:22:22+5:302024-01-18T17:23:42+5:30

Ashok Tanwar: लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. हरयाणातील आम आदमी पक्षाचे नेते अशोक तंवर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Big blow to Aam Aadmi Party, big leader Ashok Tanwar left the party, will now go to BJP? | आम आदमी पक्षाला मोठा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडला पक्ष, आता भाजपात जाणार?

आम आदमी पक्षाला मोठा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडला पक्ष, आता भाजपात जाणार?

 लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. हरयाणातील आम आदमी पक्षाचे नेते अशोक तंवर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अशोक तंवर हे हरियाणामधील आम आदमी पक्षाचा चेहरा होते. तसेच ते हरियाणामधील आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे चेअरमन होते. मात्र आता त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते शुक्रवारी भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये होत असलेल्या आघाडीमुळे अशोक तंवर नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला होता. मागच्याच  आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती.

एक काळ होता जेव्हा अशोक तंवर हे हरियाणाच्या राजकारणात काँग्रेसचे युवा चेहरा मानला जात असत. मात्र २०२१ मध्ये नोव्हेंबर महिन्यात पक्षनेतृत्वाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अशोक तंवर यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला. मात्र आता त्यांनी आम आदमी पक्षही सोडला.  

Web Title: Big blow to Aam Aadmi Party, big leader Ashok Tanwar left the party, will now go to BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.