भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 02:16 PM2018-12-16T14:16:48+5:302018-12-16T15:13:08+5:30

भुपेश बघेल हे छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत. 

Bhupesh Baghel to be the Chief Minister of Chhattisgarh | भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा

भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा

Next

नवी दिल्ली - छत्तीगडच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. रविवारी (16 डिसेंबर) छत्तीगसडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बघेल यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास बघेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, अशी माहिती समोर आली आहे. 
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बघेल यांच्याव्यतिरिक्त टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरण दास महंत देखील होते. मात्र बघेल यांचे नाव आघाडीवर होते.  दरम्यान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 68 जागांवर विजय मिळला आहे.

कोण आहेत भुपेश बघेल?
भुपेश बघेल हे छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.  23 ऑगस्ट 1961साली बघेल यांचा जन्म छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील पाटण तालुक्यात झाला. 1985 पासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1993 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 

मध्य प्रदेशातील तत्कालिन दिग्विजय सिंह सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीदेखील होते. 2000 मध्येही जोगी सरकारमध्येही त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होते. ओबीसी नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी घटवण्यामध्ये बघेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचे म्हटले जाते. 



 



 




दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटवरवरुन छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भुपेश बघेल आणि चरणदास महंत या चार दिग्गज नेत्यांसोबत आपला फोटो शनिवारी (15 डिसेंबर ) शेअर केला होता.  राजधानी दिल्लीत शनिवारी राहुल गांधी यांच्यासोबत टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भुपेश बघेल आणि चरणदास महंत यांची बैठक झाली. यावेळी बैठकीला पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगड प्रभारी पुनिया उपस्थित होते. छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदासाठी टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भुपेश बघेल आणि चरणदास महंत यांची नावे सध्या जोरदार चर्चेत होती.



 

Web Title: Bhupesh Baghel to be the Chief Minister of Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.