भिकारी करणार मोदी सरकारच्या योजनांचे प्रोमोशन

By Admin | Published: August 4, 2015 12:31 PM2015-08-04T12:31:59+5:302015-08-04T12:39:57+5:30

स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ - बेटी पढाओ अशा विविध सरकारी योजनांची जनजागृती करण्यासाठी मोदी सरकार आता भिका-यांची मदत घेणार आहे.

Beggar Promotion of Modi Government's Schemes | भिकारी करणार मोदी सरकारच्या योजनांचे प्रोमोशन

भिकारी करणार मोदी सरकारच्या योजनांचे प्रोमोशन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ - बेटी पढाओ अशा विविध सरकारी योजनांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मोदी सरकार आता भिका-यांची मदत घेणार आहे. या योजनांचा प्रसार करण्यासाठी सरकारने ट्रेनमध्ये गाणे गाणा-या भिका-यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या साँग व ड्रामा विभागाने सरकारी योजनांच्या जनजागृतीसाठी एक भन्नाट आयडिया शोधली आहे. यानुसार  सरकार तीन हजार भिका-यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग मुंबईत केला जाणार असून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये गाऊन भीक मागणा-या भिका-यांमधून ही निवड केली जाईल असे अधिका-यांनी सांगितले. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये अनेक भिकारी गाऊन भीक मागतात. अनेकांचे संपूर्ण कुटुंब यावरच उदरनिर्वाह करते. आम्ही या योजनेकडे भिका-यांसाठी रोजगाराचे साधन म्हणून बघतो, त्यांच्यातील कौशल्याचा योग्य पद्धतीने वापर होऊ शकतो असे संबंधीत अधिका-याने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. फिल्ड ऑफिसर सध्या उत्तम गाणा-या भिका-यांचा शोध घेत असून यासाठी एनजीओचीही मदत घेतली जात आहे.
 सरकारी योजनांची माहिती देणा-या गाण्यांचे गीतही तयार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशिक्षित भिकारी लोकल ट्रेन व शहरातील कानाकोप-यात फिरुन सरकारी योजनेचा प्रचार करतील. या मोहीमेत लहान भिका-यांना सामील करुन घेणार नाही असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Beggar Promotion of Modi Government's Schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.