बंगळुरूत शिपायाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Published: July 30, 2014 12:45 PM2014-07-30T12:45:52+5:302014-07-30T12:46:16+5:30

बंगळुरू येथील एका शाळेत शिपायाच्या मुलाने सात वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

In Bangalore, the girl's son raped a minor | बंगळुरूत शिपायाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बंगळुरूत शिपायाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next
>ऑनलाइन टीम
बंगळुरू, दि. ३० - बंगळुरू येथील एका शाळेत सहा वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना उघडकीस आल्यावर माजलेला गोंधळ अद्याप सुरू असतानाच शहरातील आणखी एका शाळेत मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आहे. शांती धामा शाळेत एका ७ वर्षीय मुलीवर शाळेतील शिपायाच्या मुलानेच अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 
बंगळुरूतील  विबग्योर हायस्कूलमध्ये २ जुलै रोजी एका सहा वर्षाच्या मुलीवर अज्ञात लोकांनी बलात्कार केला होता; परंतु १५ जुलै रोजी हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलिसांनी काल दोघांना अटक केली होती. या घटनेमुळे कर्नाटकसह देशभरातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच बलात्काराची दुसरी घटना समोर आली आहे. 

Web Title: In Bangalore, the girl's son raped a minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.