खारघर येथे रिलायन्स कंपनीच्या मॅनेजरच्या अपहरणाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:12 AM2019-05-28T05:12:39+5:302019-05-28T05:12:45+5:30

हितेन शहा यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाडा येथील तिघांवर खारघर पोलीस ठाण्यात सोमवारी अपहरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Attempt to kidnap Reliance's company manager at Kharghar; Three accused filed | खारघर येथे रिलायन्स कंपनीच्या मॅनेजरच्या अपहरणाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

खारघर येथे रिलायन्स कंपनीच्या मॅनेजरच्या अपहरणाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Next

पनवेल : जामनगर ते नागोठणे मिथेन गॅसच्या वाहिनी प्रकल्प व्यवस्थापक हितेन शहा यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाडा येथील तिघांवर खारघर पोलीस ठाण्यात सोमवारी अपहरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅसवाहिनी वाडा या ठिकाणाहून जाते. येथील एका शेतकऱ्याच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात तुषार सावंत, मोहन सावंत व पी टी सावंत हे या प्रकल्पाचे व्यवस्थापक हितेंन शहा यांना विचारणा करण्यासाठी खारघरमध्ये आले होते.
यावेळी तिघांनी शहा यांना आपल्या गाडीत बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार शहा यांनी खारघर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
अपहरण करताना तिघांनी ऐरोली येथे सोडून दिल्याचे शहा यांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत. तिघेही आरोपी फरार आहेत. त्यांचा या परिसरात शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Attempt to kidnap Reliance's company manager at Kharghar; Three accused filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.