अरुणसिंग अमेरिकेत भारताचे नवे राजदूत

By admin | Published: March 1, 2015 11:51 PM2015-03-01T23:51:47+5:302015-03-01T23:51:47+5:30

भारताने सध्या फ्रान्समध्ये राजदूत असलेल्या अरुणसिंग यांना अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्त केले असून, त्यासंबंधीचा करार अमेरिकन

Arun Singh, India's new ambassador to America | अरुणसिंग अमेरिकेत भारताचे नवे राजदूत

अरुणसिंग अमेरिकेत भारताचे नवे राजदूत

Next

नवी दिल्ली : भारताने सध्या फ्रान्समध्ये राजदूत असलेल्या अरुणसिंग यांना अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्त केले असून, त्यासंबंधीचा करार अमेरिकन सरकारकडे पाठविला आहे. एस. जयशंकर यांची विदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याने, त्यांची जागा अरुणसिंग हे घेतील.
सध्या बहरीन येथे राजदूत असलेले मोहनकुमार यांना फ्रान्सला पाठविले जाईल. अरुणसिंग यांचे नाव पाठविल्यानंतर ओबामा प्रशासनाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलमध्ये पॅरिस भेटीवर जात असून, त्यानंतर नवे फेरबदल हाती घेतले जातील.

Web Title: Arun Singh, India's new ambassador to America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.