३० देशांचे सैन्यदल प्रमुख दिल्लीत; संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:27 AM2023-09-27T06:27:52+5:302023-09-27T06:28:37+5:30

संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले, आव्हानांना एकट्याने तोंड देणे सध्या अशक्य

Army chiefs of 30 countries in Delhi; Defense Minister Rajnath Singh said... | ३० देशांचे सैन्यदल प्रमुख दिल्लीत; संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले...

३० देशांचे सैन्यदल प्रमुख दिल्लीत; संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या गुंतागुंतींना सामोरे जाण्यासाठी आणि या प्रदेशात समृद्धी, सुरक्षा आणि सर्वसमावेशक भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी केले.

१३ व्या हिंद प्रशांत महासागर क्षेत्र सैन्यदल प्रमुखांच्या संमेलनात(आयपीएसीसी) सिंह म्हणाले की, राष्ट्रांनी हे समजून घेतले पाहिजे की जागतिक समस्यांमध्ये अनेक देशांचा संबंध येतो आणि कोणताही देश या आव्हानांना एकट्याने तोंड देऊ शकत नाही. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनच्या आक्रमक लष्करी वर्तनावर वाढत्या जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांची टिप्पणी आली आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम’ या प्राचीन भारतीय मूल्यांच्या अनुषंगाने हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता आणि समृद्धी साधली जाऊ शकते. भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या या परिषदेत ३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

शांततापूर्ण विवाद सोडवणुकीवर भर
भारताचा दृष्टिकोन सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्यावर भर देतो, विवादांचे शांततापूर्ण निराकरण, बळाचा वापर टाळणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन यावरही आमचा भर आहे. शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी या प्रदेशातील सर्व पक्षांशी रचनात्मकच चर्चेची भारताची वचनबद्धता अटल आणि स्थिर आहे.    - जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख  

आम्ही अजूनही शत्रुत्वाला तोंड देत आहोत
मुक्त हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रासाठी सर्व राष्ट्रांकडून प्रयत्न केले जात असतानाही, आम्ही आंतरराज्य वाद आणि शत्रुत्वाला तोंड देत आहोत. आम्ही सीमेपलीकडून आव्हानांना तोंड देत आहोत आणि त्यांना आमच्या प्रत्युत्तरात ही बाब लक्षात ठेवली पाहिजे,” असेही लष्करप्रमुख म्हणाले.

लष्करी संबंधांवर परिणाम नाही : कॅनडा
भारत आणि कॅनडा दरम्यान सुरू असलेल्या राजनैतिक वादाचा त्यांच्या द्विपक्षीय लष्करी संबंधांवर परिणाम होणार नाही 
आणि हे प्रकरण राजनैतिक पातळीवर सोडवावे लागेल, असे कॅनडाचे उपलष्कर प्रमुख मेजर जनरल पीटर स्कॉट यांनी मंगळवारी म्हटले. 

Web Title: Army chiefs of 30 countries in Delhi; Defense Minister Rajnath Singh said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.