ap cm chandrababu naidus dharna in delhi tdp targets pm narendra modi | "ज्याला चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्याला जनतेनं पंतप्रधान बनवलं"
"ज्याला चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्याला जनतेनं पंतप्रधान बनवलं"

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेनं देश सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चाय वाला म्हटलं जाते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्यानं अनेकांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता.

आता पोस्टरच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. मालवीयनं लिहिलं आहे की, विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणं हा अभिशाप आहे काय ?, असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान, चंद्राबाबू नायडू मोदी सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणावर बसले आहेत. मोदी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबूंनी लावून धरली आहे. रविवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशातील रॅली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली.  'जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलेच माहीत आहे. हा आंध्र प्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल, आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणे थांबवा', असा शब्दांत चंद्राबाबू नायडूंनी इशारा दिला आहे. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे.

 


Web Title: ap cm chandrababu naidus dharna in delhi tdp targets pm narendra modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.