anyone who insults cm and pm will disappear from world says bjp mp manohar untwal | मोदींचा अपमान करणाऱ्याला जगातून गायब करू: भाजप खासदार
मोदींचा अपमान करणाऱ्याला जगातून गायब करू: भाजप खासदार

मध्य प्रदेशमध्ये यंदाच्या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्याआधीच नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपचे मध्य प्रदेशामधील खासदार मनोहर ऊंटवाल यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. 'आमच्या पंतप्रधानांचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही या जगातून गायब करु,' असं ऊंटवाल यांनी म्हटलं. किसान सन्मान यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केलं. याआधीही ऊंटवाल यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. 

गेल्याच आठवड्यात खासदार ऊंटवाल यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली होती. दिग्विजय सिंह दिल्लीवरुन आयटम घेऊन आले आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य ऊंटवाल यांनी केलं होतं. दिग्विजय सिंह यांची पत्नी अमृता सिंह यांच्याबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली होती. मात्र त्यांनी अमृता सिंह यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. या विधानावरुन ऊंटवाल यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. यानंतर ऊंटवाल यांनी याबद्दल सारवासारव केली. 'मी दिग्विजय सिंह यांचा खूप आदर करतो आणि महिलांचाही सन्मान करतो,' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. माझ्या विधानाची मोडतोड करुन ते दाखवण्यात आलं, असाही दावा त्यांनी केला. 
 


Web Title: anyone who insults cm and pm will disappear from world says bjp mp manohar untwal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.