मोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 06:18 AM2018-09-22T06:18:29+5:302018-09-22T06:18:43+5:30

राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी केलेल्या खुलाशानंतर मोदी सरकार आणखीच अडचणीत आले आहे.

Anil Ambani's involvement in Rafael deal: Modi's claim | मोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा

मोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा

Next

- शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी केलेल्या खुलाशानंतर मोदी सरकार आणखीच अडचणीत आले आहे. या व्यवहारात अनिल अंबानी यांना आणण्यात भारत सरकारची शिफारसच कारणीभूत होती, असे ओलांद यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कांग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, राफेलच्या सौद्यात पंतप्रधान मोदी यांनी स्वत: केला आणि त्यांनीच त्यात हा बदल केला. हे सारे बंद दरवाजाआड झाले. फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी हे उघड केल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. मोदी यांनीच दिवाळखोर अनिल अंबानी यांना या कोट्यवधीच्या सौद्यात सहभागी केल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी देशाशी धोका केला आहे, असा आरोपही त्यांनी केला ं्रआहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सचे नाव मोदी सरकारनेच सुचविले होते, असेही ओलांद यांनी म्हटले आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स एंटरटेनमेंट व ओलांद यांचे मित्र ज्युली गेयेट हे संयुक्तपणे चित्रपटनिर्मिती करीत आहेत, हेही इथे महत्त्वाचे ठरेत.
ओलांद यांच्या स्पष्टिकरणानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, आता खोटेपणा उघड झाला आहे. चौकीदार केवळ भागीदार नसून, गुन्हेगारही आहे.
सुरजेवाला म्हणाले की, एचएएल या सरकारी कंपनीला दूर करून रिलायन्सला ३0 हजार कोटींच्या व्यवहारात फायदा मिळवून देण्यात आपला काही संबंध नाही, असा खोटा दावा मोदी सरकार सातत्याने करीत होती. पण ओलांद यांच्या एका मुलाखतीने सारा खोटेपणा समोर आला आहे.
ओलांद यांच्या वक्तव्यानंतर संरक्षण मंत्रालयही खडबडून जागे झाले. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी जे म्हटल्याचे सांगण्यात येत आहे, ते आम्ही तपासून पाहत आहोत. त्यापूर्वी याविषयी काहीही सांगता येणार नाही.
ओलांद यांच्या हवाल्याने प्रकाशित झालेल्या लेखामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सला मोदी सरकारच्या शिफारसीमुळेच ३0 हजार कोटींच्या व्यवहारात सहभागी करून घेण्यात आल्याचे म्हटले आहे. बहुधा याची माहिती राहुल गांधी यांना आधीच होती. त्यामुळे काही दिवस आधी राहुल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, मोदीजी, सावधान, राफेलवरून मोठा वाद निर्माण होणार आहे.

Web Title: Anil Ambani's involvement in Rafael deal: Modi's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.