अमित शहा नवे भाजपाध्यक्ष, उद्या होणार घोषणा

By Admin | Published: July 8, 2014 11:57 AM2014-07-08T11:57:12+5:302014-07-08T11:59:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू व पक्षाचे सरचिटणीस अमित शहा यांची भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होणार असून बुधवारी त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे समजते.

Amit Shah will be the new BJP president, tomorrow's announcement | अमित शहा नवे भाजपाध्यक्ष, उद्या होणार घोषणा

अमित शहा नवे भाजपाध्यक्ष, उद्या होणार घोषणा

googlenewsNext
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू व पक्षाचे सरचिटणीस अमित शहा यांची भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होणार असून उद्या (बुधवारी) त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, उद्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडल्यानंतर शहा यांची भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. 
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांना मोदी सरकारमध्ये गृहमंत्री बनविण्यात आल्याने भाजपाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तींचा शोध सुरू झाला होता. त्यात अमित शहा यांच्यासह जगत प्रकाश नड्डा आणि ओम माथुर यांच्या नावाच समावेश होता. मात्र अमित शहा यांच्या मेहनतीमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये तब्बल ७३ जागा जिंकत्या आल्या. शहा यांच्या मेहनतीचे श्रेय त्यांना देऊन त्यांचे यश हाच निकष मानून भाजपने शहा यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचे ठरवले आहे.

Web Title: Amit Shah will be the new BJP president, tomorrow's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.