गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; ऐन निवडणुकीतच अल्पेश ठाकोरने सोडला 'हात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 10:40 AM2019-04-10T10:40:31+5:302019-04-10T10:41:15+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Alpesh Thakor quits Congress ahead of Lok Sabha elections | गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; ऐन निवडणुकीतच अल्पेश ठाकोरने सोडला 'हात'

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; ऐन निवडणुकीतच अल्पेश ठाकोरने सोडला 'हात'

अहमदाबाद: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्येकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचे वृत्त आहे. अल्पेश ठाकोर यांच्या जवळचे सहकारी धवल झाला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला याबाबतची माहिती दिली आहे.  

गेल्या काही दिवसांपासून अल्पेश ठाकोर काँग्रेसचा 'हात' सोडणार आणि भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सुरु होती. मात्र, गेल्या मार्च महिन्यात अल्पेश ठाकोर यांनी यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. त्यावेळी अल्पेश ठाकोर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहून पार्टीला पाठिंबा देणार आहे आणि समाजाच्या हक्कासाठी लढणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांचे सहकारी धवल झाला यांनी आज 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचे समजते. 

दरम्यान, काँग्रेसचा हात सोडल्यानंतर अल्पेश ठाकोर भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने दुर्लक्षित केल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केला होता. त्यामुळे नाराज अल्पेश ठाकोर भाजपाचा 'हात' पकडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यापूर्वी काँग्रेस आमदार हकुभा जडेजा यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना देखील मंत्रीपद दिले गेले होते. 
 

Web Title: Alpesh Thakor quits Congress ahead of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.