अयोध्येत आलमगिरी मशिदीची पुन्हा बांधणी

By admin | Published: September 2, 2016 06:17 AM2016-09-02T06:17:21+5:302016-09-02T06:17:21+5:30

अयोध्येमध्ये ३०० वर्षे जुनी व मोडकळीस आलेली आलमगिरी मशीद पुन्हा बांधली जाणार आहे. या मशिदीला तिच्या सध्याच्या अवस्थेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने वापरण्यास धोकादायक ठरविलेले आहे.

Alamgiri mosque rebuilt in Ayodhya | अयोध्येत आलमगिरी मशिदीची पुन्हा बांधणी

अयोध्येत आलमगिरी मशिदीची पुन्हा बांधणी

Next

अयोध्या : अयोध्येमध्ये ३०० वर्षे जुनी व मोडकळीस आलेली आलमगिरी मशीद पुन्हा बांधली जाणार आहे. या मशिदीला तिच्या सध्याच्या अवस्थेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने वापरण्यास धोकादायक ठरविलेले आहे.
ही मशीद हनुमानगढी मंदिराच्या विश्वस्तांच्या मालकीच्या जागेवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने ही मशीद वापरण्यास धोकादायक असल्याचे जाहीर करून तेथे या इमारतीत प्रवेशास बंदी असल्याची सूचनाही चिकटवली होती. यानंतर लगेचच हनुमानगढी विश्वस्तांनी तिच्या फेरउभारणीसच केवळ मान्यता दिली व खर्चही उचलण्याची तयारी दाखविली असे नाही, तर मुस्लिमांनी तेथे नमाज पढण्यास यावे, असे आवाहनही केले आहे.
अयोध्या नगरपालिका मंडळाने नुकताच तिच्या भिंतीवर ‘मशिदीत प्रवेशास बंदी’ अशी नोटीस चिकटवली. या नोटिशीमुळे स्थानिक मुस्लिमांच्या गटाने हनुमानगढीचे प्रमुख पुजारी महंत ग्यान दास यांना भेटून मशिदीची डागडुजी करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. या भेटीने मुस्लिमांना सुखद धक्काच बसला. मंदिर विश्वस्तांनी स्थानिक मुस्लिमांना केवळ मशीद पुन्हा बांधण्यासच परवानगी दिली असे नाही, तर त्यासाठीचा खर्चही उचलायची तयारी दाखविली.

खुदा का घर
‘मी आमच्या मुस्लीम बांधवांना मशिदीचा जीर्णोद्धार करून ती आमच्या खर्चाने पुन्हा बांधा; तसेच मशीद ही देवाचे स्थान (खुदा का घर) असल्यामुळे तेथे नमाज पढण्यास कोणताही आक्षेप घेतलेला नाही,’ असे महंत ग्यान दास यांनी सांगितले. दास हे रमझानच्या महिन्यात इफ्तारचेही आयोजन करीत असतात.

मुगल सम्राट औरंगजेबाच्या संमतीनंतर आलमगिरी मशीद त्यांच्या जनरलने १७व्या शतकात बांधली. ही मशीद आणि ती उभी असलेली जागा अरगरा म्हणून ओळखले जाते. १७६५मध्ये नवाब शुजाउद्दौला यांनी मंदिराला ही जमीन दान दिली; परंतु मशिदीमध्ये नमाज पढणे सुरूच राहील या अटीवर. नमाज पढणे कमीकमी होत गेले. देखभालीअभावी ती पडीक झाली होती.

Web Title: Alamgiri mosque rebuilt in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.