video: आता शाळेत शिकवणार AI शिक्षक, 'या' राज्यातील शाळेत सुरू झाला अनोखा प्रयोग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 07:00 PM2024-03-06T19:00:33+5:302024-03-06T19:01:26+5:30

Artificial Intelligence Teacher in Kerala: शाळेत शिकवणाऱ्या या ह्युमनॉइड रोबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पााहा

AI Teacher video: Now the AI teacher will teach in the school, a unique experiment has started in kerala school | video: आता शाळेत शिकवणार AI शिक्षक, 'या' राज्यातील शाळेत सुरू झाला अनोखा प्रयोग...

video: आता शाळेत शिकवणार AI शिक्षक, 'या' राज्यातील शाळेत सुरू झाला अनोखा प्रयोग...

Artificial Intelligence Teacher: गेल्या काही काळापासून भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) ची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रात रोज नवनवीन बदल होताना दिसत आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भारतातही शिक्षण क्षेत्रातही होतोय. केरळ हे पहिले राज्य बनले आहे, जिथे AIच्या मदतीने शिक्षण घेतले जात आहे. 

यासाठी एका ह्युमनॉइड रोबोटचा वापर करण्यात येत आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम येथील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात या AI शिक्षकाचा गेल्या महिन्यातच समावेश करण्यात आला. हा AI शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. साडी घालून शिकवणाऱ्या या महिला रोबोट शिक्षकाचे नाव 'आयरिस' आहे. या रोबोटमध्ये अनेक फीचर्स आहेत. AI रोबोट आणणाऱ्या कंपनी 'MakerLabs Edutech' च्या मते Iris ही केरळमधील, नव्हे तर देशातील पहिली जनरेटिव्ह AI शिक्षक आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Iris तीन भाषांमध्ये बोलू शकते आणि विद्यार्थ्यांच्या कठीण प्रश्नांची उत्तरे अगदी सहज आणि सोप्या भाषेत देऊ शकते. ChatGPT सारख्या प्रोग्रॅमिंगपासून बनवलेले आयरिसचे नॉलेज बेस इतर ऑटोमॅटिक शिक्षण साधनांपेक्षा खूप प्रगत आहे.

MakerLabs च्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना ड्रग्ज, सेक्स आणि हिंसा यासारख्या विषयांची माहिती देण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. MakerLabs चे CEO हरी सागर म्हणाले की, AI च्या वापरातुन अनेक गोष्टी करता येतात. विद्यार्थी प्रश्न विचारतात तेव्हा आयरिस मानवाप्रमाणे उत्तरे देते. AI सह शिकणे मजेशीर असेल. शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा एमएन सांगतात की, 3 हजारांहून अधिक विद्यार्थी असलेल्या या शाळेतील पुढील शैक्षणिक सत्रात जनरेटिव्ह एआय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याची योजना आहे.

Web Title: AI Teacher video: Now the AI teacher will teach in the school, a unique experiment has started in kerala school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.