नोटाबंदीनंतर एका व्यक्तीने बँकेत जमा केले २४६ कोटी

By admin | Published: March 26, 2017 08:21 PM2017-03-26T20:21:26+5:302017-03-26T20:28:16+5:30

नोटाबंदीनंतर तामिळनाडू आणि पडुचेरीत नागरिकांनी ६०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत.

After the anniversary, a person deposited Rs 246 crore in the bank | नोटाबंदीनंतर एका व्यक्तीने बँकेत जमा केले २४६ कोटी

नोटाबंदीनंतर एका व्यक्तीने बँकेत जमा केले २४६ कोटी

Next

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 26 : नोटाबंदीनंतर तामिळनाडू आणि पडुचेरीत नागरिकांनी ६०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. पण, एक व्यक्ती अशीही आहे की ज्याने तब्बल २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा या कालावधीत जमा केल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिरुचेगोड येथे एका व्यक्तीने इंडियन ओव्हरसीज बँकेत २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत.

आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एवढी मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती मिळताच आम्ही या व्यक्तीचा १५ दिवस पाठलाग केला. नंतर या व्यक्तीने ४५ टक्के कर भरण्याची तयारी दर्शविली. यातील २५ टक्के रक्कम सरकारकडे राहणार असून या व्यक्तीला त्या रकमेचे व्याजही मिळणार नाही. आयकर विभागाला तामिळनाडू आणि पडुचेरीत २८ हजार संशयित खाते आढळले आहेत.

Web Title: After the anniversary, a person deposited Rs 246 crore in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.