8 दिवसांनंतर कोचीवरून व्यावसायिक उड्डाणे सुरू, नौदलाच्या तळावरून वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 08:46 AM2018-08-20T08:46:02+5:302018-08-20T08:51:39+5:30

केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे.

After 8 days, commercial flights from Kochi start, traffic will go to the bottom of the navy | 8 दिवसांनंतर कोचीवरून व्यावसायिक उड्डाणे सुरू, नौदलाच्या तळावरून वाहतूक

8 दिवसांनंतर कोचीवरून व्यावसायिक उड्डाणे सुरू, नौदलाच्या तळावरून वाहतूक

Next

कोची- केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला असून, कोची विमानतळावरून 8 दिवसांनंतर व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. परंतु या विमानांचं उड्डाण सध्या तरी नौदलाच्या तळावरून करण्यात येत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभूंनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. बंगळुरू आणि कोचीदरम्यान नौसेनेच्या एअरबेसवरून 20 ऑगस्टपासून व्यावसायिक उड्डाण सुरू होणार आहेत. कोईंबतूर, मदुराईमध्येही काम सुरू आहे. इतर विमान कंपन्यांही उड्डाण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सर्व शक्य असलेले प्रयत्न केले जातील, असंही सुरेश प्रभू म्हणाले होते.


 भीषण पुरात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. पहिल्या टप्प्यात ६.५ टन सामग्री पाठविल्यानंतर रविवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य शासनाकडून आणखी ३० टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आणखी पाच टन साहित्य रवाना करण्यात येणार आहे.
विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात करत आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत.
केरळमधला रेड अलर्ट हटवला, बचावकार्याला आला वेग
Kerala Floods : केरळच्या मदतीला २४ विमाने, ७२ हेलिकॉप्टर, इस्रोचे ५ उपग्रह!
9 ऑगस्टनंतर 196 लोकांचा मृत्यू झाला तर, शनिवारी पुरात 22 लोक वाहून गेले. सध्या 6, 61,887 माणसांना 3466 रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. घरदार, शेती सारेच नष्ट झाल्याने अनेक जण मानसिकरीत्या पुरते खचले आहेत, तर काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जखमींबरोबरच मानसिक आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठी असून, त्यात केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण व लहान मुलेही आहेत. शाळा, महाविद्यालये कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.

Web Title: After 8 days, commercial flights from Kochi start, traffic will go to the bottom of the navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.