मुंबईनंतर दिल्लीत 60 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 03:53 PM2017-11-24T15:53:40+5:302017-11-24T16:05:02+5:30

भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली असताना राजधानी दिल्लीतही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. 

After 60 years of building collapsed in Mumbai, two people died after Mumbai | मुंबईनंतर दिल्लीत 60 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

मुंबईनंतर दिल्लीत 60 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली: भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली असताना राजधानी दिल्लीतही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. 
इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यू फ्रेंड्स कॉलनीजवळ तैमूर नगरमध्ये ही इमारत कोसळली. येथील गुरूद्वाराजवळ सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. 




यापूर्वी भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.  या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. आणखी सात ते आठ जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अग्निशमन दलाकडून बचावकार्य राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ढिगा-याखालून आतापर्यंत चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वस्तीकडे जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे बचावकार्यातही मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. 

जखमींची संख्या
IGM हॉस्पिटल
1)  आसिफ याकूब खान ( 19वर्ष ) 
2) याकूर युसुफ खान ( 58 वर्ष )
3) शकील  अन्सारी ( 37 वर्ष )

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल 
1) सलमा अन्सारी  ( 45 वर्ष )   
2) रेहान खान ( 7 वर्ष )
3)ख्वाजा मेहमूद सय्यद ( 55 वर्ष )
4) अबिद खान ( 21 वर्ष )

मृत व्यक्तीचे नाव
1) रुखसार याकूब खान  (18 वर्ष )

Web Title: After 60 years of building collapsed in Mumbai, two people died after Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.