एअर इंडिया विका, निती आयोगाचा सल्ला

By Admin | Published: May 31, 2017 08:52 AM2017-05-31T08:52:07+5:302017-05-31T08:52:07+5:30

नियोजन आणि विकासात महत्वाची भूमिका असलेल्या निती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक करण्याची शिफारस केली आहे.

Advice on the development of Air India, Niti Commission | एअर इंडिया विका, निती आयोगाचा सल्ला

एअर इंडिया विका, निती आयोगाचा सल्ला

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 31 - नियोजन आणि विकासात महत्वाची भूमिका असलेल्या निती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक करण्याची शिफारस केली आहे. सध्या तोटयात असलेल्या एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक केली तर, सरकारचा पैसा वाचेल आणि तोच पैसा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी वापरता येईल असे निती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
 
या अहवालामुळे केंद्र सरकारला निर्गुतवणूकीची प्रक्रिया सुरु करता येईल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धा नुकसानीमध्ये चालणा-या एअर इंडियाच्या विक्रीला पाठिंबा दिला आहे. एअर इंडियासंबंधी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 
 
निती आयोगाने एअर इंडियासंबंधी चौथा अहवाल सरकारला दिला असून त्यामध्ये निर्गुतवणूकीच्या प्रक्रियेच्या रोडमॅप असू शकतो. एअर इंडियावर 60 हजार कोटींचे कर्ज असून, 21 हजार कोटींचे कर्ज विमानासंबंधी तर, 8 हजार कोटींचे भांडवली कर्ज आहे. एअर इंडियाच्या नव्या मालकाकडे ही दोन्ही कर्जे ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 
 
एअर इंडियाला आतापर्यंत 40 हजार कोटींचा तोटा झाला असून, चालू आर्थिकवर्षात 3 हजार कोटी रुपयांच्या रोख रक्कमेची कमतरता भासणार आहे. 2015-16 वर्षात एअर इंडियाचे ऑपरेटींग नफा 105 कोटी होता. पण नफ्याचा हा आकडा कायम राहणार नसल्याचा अंदाज आहे. 
 
मागच्या पाचवर्षात एअर इंडिया चालवण्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपये खर्च केले असून, पुढच्या काहीवर्षात इतकीच रक्कम खर्च करावी लागणार आहे. केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री गजपती राजू आणि जयंत सिन्हा यांनी निती आयोगाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. पण त्या काय आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही. 
 
आम्हाला एअर इंडियाचा अभिमान असून सर्व पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. एअर इंडियाला व्यवहार्य बनवण्यासाठी निती आयोगाने काही कठोर उपाय सुचवले आहेत असे राजू यांनी सरकारच्या तिस-यावर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
एअर इंडिया मालमत्ता विकणार ?
एअर इंडियाच्या मुंबई, बंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथील काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आणि फ्लॅटची विक्री करण्यात येईल असे समजते. सात मालमत्ता विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्यापोटी ८0 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Advice on the development of Air India, Niti Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.