९.३ कोटी ‘पॅन’ आधारशी जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:37 AM2017-08-17T00:37:31+5:302017-08-17T00:37:33+5:30

९.३ कोटी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहेत, अशी माहिती आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

9.3 crore was added to the 'PAN' basis | ९.३ कोटी ‘पॅन’ आधारशी जोडले

९.३ कोटी ‘पॅन’ आधारशी जोडले

Next

नवी दिल्ली : ९.३ कोटी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहेत, अशी माहिती आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. पॅन आणि आधार कार्ड जोडणीची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जोडणीचा आकडा आणखी वाढेल, असे आयकर अधिकाºयाने सांगितले.आयकर विवरणपत्र भरणे आणि नवीन आधार कार्ड काढणे यासाठी आधार बंधनकारक करण्याचा निर्णय १ जुलैपासून लागू करण्यात आला आहे. केंद्रीय थेट बोर्डाने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार, ५ आॅगस्टपर्यंत विवरणपत्राच्या ई-फायलिंगसाठी आधार क्रमांक नुसता सोबत दिला तरी चालत होते. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही, त्यांनी आधार कार्ड काढण्याकरिता केलेल्या नोंदणीचा क्रमांक देण्यास सांगण्यात आले होते. पॅन आणि आधारची जोडणी त्यानंतर ३१ आॅगस्टपर्यंत केव्हाही करता येऊ शकते.
तथापि, पॅन-आधार जोडणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आयकर विवरणपत्र प्रोसेस केले जाणार नाही, असा इशारा बोर्डाने दिला आहे.

Web Title: 9.3 crore was added to the 'PAN' basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.