इसिसकडे जाणाऱ्या महिलेस ७ वर्षे कैद, पहिल्याच खटल्याचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:00 AM2018-03-25T01:00:04+5:302018-03-25T01:00:04+5:30

इस्लामिक स्टेटमध्ये (इसिस) भरती होऊन त्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमधील प्रदेशात आपल्या मुलासह स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात असताना दिल्लीमध्ये पकडल्या गेलेल्या यास्मिन मोहम्मद झाहीद या बिहारमधील महिलेस येथील ‘एनआयए’ विशेष न्यायालयाने शनिवारी सात वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

7 year imprisonment for the woman going to this woman, the result of the first trial | इसिसकडे जाणाऱ्या महिलेस ७ वर्षे कैद, पहिल्याच खटल्याचा निकाल जाहीर

इसिसकडे जाणाऱ्या महिलेस ७ वर्षे कैद, पहिल्याच खटल्याचा निकाल जाहीर

Next

कोची : इस्लामिक स्टेटमध्ये (इसिस) भरती होऊन त्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमधील प्रदेशात आपल्या मुलासह स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात असताना दिल्लीमध्ये पकडल्या गेलेल्या यास्मिन मोहम्मद झाहीद या बिहारमधील महिलेस येथील ‘एनआयए’ विशेष न्यायालयाने शनिवारी सात वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
इसिसच्या विरोधातील भारतात दाखल झालेला पहिलाच खटला असून, निकाल लागलेलेही हे पहिलेच प्रकरण आहे. मुलगा लहान असल्याने आपल्याला ‘प्रोबेशन’वर सोडावे, ही आरोपीची विनंती न्यायाधीश एस. संतोष कुमार यांनी फेटाळली. मात्र महिला म्हणून दया दाखवून आपण तिला तुलनेने कमी शिक्षा देत आहोत, असे त्यांनी नमूद केले. यास्मिन ही मूळची बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील मुरौल गावची रहिवासी आहे. तिचा पती अब्दुल रशीद आधीच ‘इसिस’मध्ये सामील झाला होता. काबुलमार्गे अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात जाण्यासाठी निघाली असता तिला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

यास्मिन मोहम्मद झाहीद हिचा नवरा अब्दुल रशीद अब्दुल्ला याने सन २०१५च्या रमझान महिन्यात कासरगोड व अन्य भागांत प्रचार करून ‘इसिस’साठी तरुणांची भरती केली होती. त्यापैकी केरळच्या कासरगोड जिल्ह्यातील
१४ जण २०१६च्या मे व जुलैदरम्यान भारतातून बाहेर पडून ‘इसिस’मध्ये सामील झाले होते. यास्मिनही या कामात आपल्या नवºयाला मदत करीत असल्याचे आढळून आले होते.

Web Title: 7 year imprisonment for the woman going to this woman, the result of the first trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.