ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि.21 - गुजरातमधील वलसाड येथे सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. शहरातील धरमपूर येथे एक जीप उलटली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जीपमधील मंडळी ही लग्नाहून परतत असल्याचीही माहिती समोर आली आहे. 
 
हा अपघात शहरातील धरमपूर येथे झाला आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
(सविस्तर वृत्त लवकरच...)