भारतातील 45 टक्के वकील बोगस

By admin | Published: January 23, 2017 01:11 PM2017-01-23T13:11:30+5:302017-01-23T13:11:30+5:30

बार कौंसिल ऑफ इंडियाच्या दोन वर्ष जुन्या सभासदांच्या पदवीची पडताळणी केल्यास भारतातील 45 टक्के वकील बोगस असून ते बनावट पदवीच्या साहाय्याने प्रॅक्‍टिस करत असल्याचे समोर आले आहे.

45 percent of lawyers in India bogus | भारतातील 45 टक्के वकील बोगस

भारतातील 45 टक्के वकील बोगस

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - बार कौंसिल ऑफ इंडियाच्या दोन वर्ष जुन्या सभासदांच्या पदवीची पडताळणी केल्यास भारतातील 45 टक्के वकील बोगस असून ते बनावट पदवीच्या साहाय्याने प्रॅक्‍टिस करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात बार कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी भारताचे मुख्य मुख्य न्यायमूर्ती जे.एस खेहर व अन्य एका न्यायधिशांसमोर वकीलांच्या पदवीवर सुरु असलेल्या पडताळणी मध्ये देशात 55-60 टक्के वकील हे खरे आहेत अशी माहिती दिली आहे. 


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जस्टिस जेएस खेहर यांना सम्मानित करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मनन कुमार मिश्रा वकील आणि न्यमुर्तीसमोर बोगस वकीलांची माहिती दिली आहे. बार कौंसिल ऑफ इंडियाच्या 2012 मधील निवडणुकींच्या आकडेवारीनुसार आपल्याजवळ 14 लाख वोटर्स वकील होते, पण पडतळणीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर फक्त 6.5 लाख वकीलांची नोंद झाली.

मिश्रा पुढे म्हणाले, प्रक्टीस करत असलेल्या सर्व वकिलांच्या पदवीची पडताळणी केली असता 45 टक्के पदव्या ह्या बनावट असल्याचे समोर आले. मिश्रा म्हणाले, देशात 30 टक्के वकील बोगस आहेत. जे चुकीच्या पद्धतीने वकिलीची बोगस पदवी मिळवून प्रॅक्टीस करत आहेत. तर 15 टक्के वकिलांकडे अधिकृत पदवीच नाही.

या गैरप्रकाराबाबत बार कौंसिल पुढाकार घेणार असून नोंद असलेला प्रत्येक वकील खरोखरीच प्रॅक्‍टिस करतो का हे पाहण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस वकीलांवर कठोर कारवाई करण्याबाबत लवकरच पुढाकार घेऊन कायद्यातच तशी तरतूद करण्याबाबत बार कौंसिल ऑफ इंडियाचे प्रयत्न सुरू असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. 

Web Title: 45 percent of lawyers in India bogus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.