सक्तीने लग्न लावण्यासाठी ३,४०० तरुणांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 04:17 AM2018-02-06T04:17:27+5:302018-02-06T04:17:36+5:30

मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये किंवा हुंडा देणे शक्य नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी उपवर तरुणास पळवून आणून त्याचा सक्तीने विवाह लावण्याची ‘पाकदुआ विवाहा’ची कुप्रथा बिहारमध्ये रुढ असून गेल्या वर्षी अशा प्रकारे ३,४०० हून अधिक तरुणांचे अपहरण करण्यात आले.

3,400 kidnapping for forced marriage | सक्तीने लग्न लावण्यासाठी ३,४०० तरुणांचे अपहरण

सक्तीने लग्न लावण्यासाठी ३,४०० तरुणांचे अपहरण

Next

पाटणा : मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये किंवा हुंडा देणे शक्य नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी उपवर तरुणास पळवून आणून त्याचा सक्तीने विवाह लावण्याची ‘पाकदुआ विवाहा’ची कुप्रथा बिहारमध्ये रुढ असून गेल्या वर्षी अशा प्रकारे ३,४०० हून अधिक तरुणांचे अपहरण करण्यात आले.
पाटणा जिल्ह्यातील एका गावात गेल्या महिन्यात एका इंजिनीअरचे अपहरण करून त्याचा अशा प्रकारे ‘पाकदुआ विवाह’ लावण्यात आला. मात्र त्याने सक्तीने गळ््यात मारलेल्या या पत्नीला सोबत सासरी नेण्यास नकार दिल्याने ही प्रथा माध्यमांपुढे आली.
वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सरकारी आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, ‘पाकदुआ विवाहा’ची प्रथा बिहारमध्ये रुढ आहे. गेल्या वर्षी सक्तीने विवाह लावण्यासाठी ३,४०५ तरुणांचे अपहरण केल्याची नोंद आहे. यापैकी बहुतांश प्रकरणात तरुणास व त्याच़्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
बिहारमध्ये अशा दररोज सरासरी नऊ ‘पाकदुुआ विवाह’ लावले जातात. सन २०१६ मध्ये ३,०७०, सन २०१५ मध्ये ३,००० व सन २०१४ मध्ये २,५२६ तरुणांचे अपहरण केले गेले होते, असे आकडेवारीवरून दिसते. बिहारमध्ये हुंड्याची प्रथा अजूनही कायम आहे. ज्या मुलीच्या कुटुंबाची हुंडा देण्याची ऐपत नाही किंवा हुंडा देण्याची इच्छा नाही असे वधुपिता आसपासच्या गावांमध्ये एखादा तरुण हेरतात व त्याचे अपहरण करून धाकधपटशाने त्याचे लग्न मुलीशी लावले जाते. मुलाची माहिती काढण्यासाठी नातेवाईक व परिचितांची मदत घेतली जाते. लग्नासाठी नवरामुलगा पळवून आणणाºया गुन्हेगारी टोळ््याही आहेत.
अपहरण करून विवाह लावल्याचे प्रत्येक प्रकरण पोलिसांकडे नोंदले जातेच असे नाही. पण तरुणांच्या अपहरणाच्या घटनांची कुप्रथेशी सांगड घातली की विदारक चित्र समोर येते.
‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड््स ब्युरो’ने प्रसिद्ध केलेल्या २०१५ च्या ताज्या आकडेवारीतही याचे स्वच्छ प्रतिबिंब दिसते. त्या आकडेवारीनुसार
सन २०१५ मध्ये बिहारमध्ये १८ ते ३० या वयोगटातील तरुणांच्या अपहरणाचे १,०९६ गुन्हे नोंदले गेले होते. संपूर्ण देशात सर्वाधिक म्हणजे १७ टक्के अशा घटना बिहारमध्ये घडल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>पोलिसांना सतर्कतेचे आदेश
हुंडा हे ‘पाकदुआ विवाहा’चे मूळ कारण आहे. सरकारलाही याची जाणीव असल्याने मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी संपूर्ण दारूबंदीनंतर हुंडाबंदीसाठी मोठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आता लग्नांचा हंगाम सुरु होईल. त्यावेळी अशा घटनांना आवर घालण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले गेले आहेत.
>‘पाकदुआ विवाह’
हे बिहारचे जुने सामाजिक दुखणे आहे. गेल्या काही वर्षांत यात सतत वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. - महेंद्र यादव,
कोशी खोºयातील सामाजिक कार्यकर्ते

Web Title: 3,400 kidnapping for forced marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.