बिहारमधील पुरामध्ये 253 जणांचा मृत्यू; 18 जिल्ह्यातील एक कोटींपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 08:45 AM2017-08-21T08:45:36+5:302017-08-21T09:17:00+5:30

बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे.

253 dead in floods in Bihar; More than one crore people in 18 districts suffered floods | बिहारमधील पुरामध्ये 253 जणांचा मृत्यू; 18 जिल्ह्यातील एक कोटींपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका

बिहारमधील पुरामध्ये 253 जणांचा मृत्यू; 18 जिल्ह्यातील एक कोटींपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका

Next
ठळक मुद्दे बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे. या पुरामध्ये आत्तापर्यंत 253 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जिल्ह्यातील एक करोड 26 लाख 87 हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे.बचावरकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पटना, दि. 21- बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे. या पुरामध्ये आत्तापर्यंत 253 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जिल्ह्यातील एक करोड 26 लाख 87 हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, तेथे बचावरकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

1152 जवान असलेल्या एनडीआरएफच्या 28 तुकड्या तसंच 118 बचाव बोटी, एसडीआरएफच्या 16 तुकड्या, 446 जवान आणि 92 बचाव बोटींकडून बचाव आणि मदत कार्य केलं जातं आहे. राज्य सरकारकडून पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास 7 लाख 21 हजार 704 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तेथे सुरू करण्यात आलेल्या 1 हजार 358 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे. एकुण 4 लाख 21 हजार 824 लोकांनी आश्रय घेतला आहे. जी लोक रहिवाली शिवारापर्यंत पोहचू शकत नाही अशांसाठी काही ठिकाणी समुदाय स्वयंपाक घर सुरू करण्यात आले आहेत. राज्यात एकुण 2569 सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आली असून त्यामध्ये 4 लाख 92 हजार 174 लोकांचं जेवण बनवलं जातं. काही भागातील पुराचं पाणी कमी होत असल्याचंही समजतं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पूर्व पंचारण जिल्ह्यातील सुरोली, बंजरिया, चिरेया, मधुबन तसंच पिपराही, सीतामढी जिल्ह्यातील रून्नीसेदपूर, मुज्जफरपूरमधील औराई, कटरा, मुसहरी आणि मुरोल, शिवहरमधील पुर क्षेत्र आणि पटना जिल्ह्यातील फतुहा, पुनपुन आणि मसोढीमधील पुरग्रस्त भाग या सगळ्या भागांची हवाई पाहणी केली. बिहारमधील 18 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणार पूर असल्याने रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. 

आसामध्ये ही पावसाचं थैमान सुरूच आहे. तेथिल एकुण 19 लाख लोकांना पुराचा फटका बसल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशातील पावसात मृत्यू झालेल्यांचा आकडा 69 झाला आहे. 

बिहारच्या पुरातील मृतांचा आकडा 253
अररिया जिल्ह्यात 57 जणांचा मृत्यू
सीमामढीमध्ये 31जणांचा मृत्यू
 पश्चिम चंपारणमध्ये 29 जणांचा मृत्यू
 कटीहारमध्ये 23 जणांचा मृत्यू
 पूर्व पंचारणमध्ये 19 जणांचा मृत्यू
मधुबनी, सुपोल तसंच मधेपुरामध्ये 13 जणांचा मृत्यू
 किशनगंजमध्ये 11 जणांचा मृत्यू
 दरभंगामध्ये 10 
 पूर्णियामध्ये 9 जणांचा मृत्यू
 गोपाजगंजमध्ये 8 जणांचा मृत्यू
 मुजफ्फरपूर, शिवहर तसंच सहरसामध्ये 44 जणांचा मृत्यू
 खगडियामध्ये 3 जणांचा मृत्यू
 सारणमध्ये एकाचा मृत्यू.
 

Web Title: 253 dead in floods in Bihar; More than one crore people in 18 districts suffered floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.