पाँझी घोटाळ्यातील २३९ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:06 AM2019-01-29T06:06:41+5:302019-01-29T06:07:01+5:30

ईडीची कारवाई; तृणमूल खासदाराची कंपनी

239 crores of assets in the Ponzi scam seized | पाँझी घोटाळ्यातील २३९ कोटींची मालमत्ता जप्त

पाँझी घोटाळ्यातील २३९ कोटींची मालमत्ता जप्त

Next

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार के. डी. सिंग यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या १,९०० कोटींंपेक्षाही जास्त रकमेच्या पोंझी योजना घोटाळ्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाने २३९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये चंदीगड, पंचकुला, डेराबस्सी, एसएएस नगर (पंजाब) व शिमला येथील मालमत्ता जप्त करण्याचा हंगामी आदेश ईडीने जारी केला आहे. मे. अलकेमिस्ट इन्फ्रा रिअल्टी लि. या कंपनीचे एचडीएफसी बँकेतील खाते गोठविण्याचे आदेशही दिले आहेत. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य २३९.२९ कोटी रुपये आहे.

गेल्या वर्षी ईडीने के. डी. सिंग यांनाही चौकशीला बोलावले होते. ते राज्यसभा सदस्य आहेत. तृणमूलने त्यांना सध्या बाजूला टाकले आहे. सिंग यांनी २०१२ मध्ये अलकेमिस्ट समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांना राज्यसभा सदस्यत्वाच्या प्रोफाईलमध्ये कंपनीचे मानद चेअरमन असे दाखवले आहे.

जमवले १९१६ कोटी
सिंग यांच्या कंपनीने राबविलेली पोंझी योजनाच मुळात बेकायदेशीर होती. चिट फंड योजना या नावानेही संबोधण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे कंपनीने तब्बल १,९१६ कोटी रुपये गोळा केले होते.

Web Title: 239 crores of assets in the Ponzi scam seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.