२०१४ पासूनच मोदींची २०१९ च्या संग्रामाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 07:12 AM2019-05-25T07:12:23+5:302019-05-25T07:12:45+5:30

२०१४ मध्ये सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. या रणनीतीनुसार त्यांनी कोट्यवधी मतदारांना सामोरे जाण्यासाठी उज्ज्वला, उजाला, प्रधानमंत्री आवाससह अनेक योजना सुरु केल्या. सोबतच भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे आणले. याचा लाभ त्यांना २०१९च्या लोकसभा निवडणुकीत झाला. २०१४ पेक्षाही मोठे यश मिळवून मोदी यांनी विरोधकांना भुईसपाट केले.

Since 2014, preparations for Modi's 2019 campaign | २०१४ पासूनच मोदींची २०१९ च्या संग्रामाची तयारी

२०१४ पासूनच मोदींची २०१९ च्या संग्रामाची तयारी

Next

संतोष ठाकूर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मारलेली मुसंडी म्हणजे भाजपची त्सुनामी म्हणावी लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणूक महासंग्रामाची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक घोषित झाल्यापासूनच सुरु केली होती.


सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पिढीतील काही निवडक नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. यात राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांचा समावेश होत. त्यांनी सर्वप्रथम धाडसी पाऊल उचलत जुन्या पिढीतील भाजप नेतृत्वाखालील सरकारमध्ये पुढील दहा वर्षे स्थान मिळणार नाही, अशा नेत्यांवर पेट्रोलियम, वाणिज्य, मनुष्यबळ विकास, पर्यावरण, कोळसा, ऊर्जा यासारख्या मंत्रालयाची जबाबदारी सोपविली. हे सर्व नवीन चेहरे भाजपपेक्षा मोदी-शहा यांच्या प्रति समर्पित होते.


पुढल्या वेळी मोदी यांचे सरकार आले नाही, तर आपलेही भवितव्य अंधकारमय होईल, याची जाणीव ठेऊनच हे सर्व पहिल्या दिवसापासून मोदी यांच्यासाठी मैदानात उतरले. त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक कार्याची किंवा भाषणाची सुरुवात मोदी यांच्याच नावाने केली. तसेच मोदी यांच्याच नामोल्लेखाने सांगता केली. अशा प्रकारचा प्रयोग मोदी यांनी राज्यांतही केला. त्यांनी जुन्या दिग्गज नेत्यांऐवजी नवीन नेत्यांवर राज्यांची धुरा सोपविली.


महाराष्टÑात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना, तर झारखंडमध्ये रघुवर दास यांना मुख्यमंत्रीपद दिले. त्रिपुरात विप्लव कुमार देव, हरियाणात मनोहर लाल खट्टर यांच्या हाती राज्याची सत्ता दिली. विरोध असतांनाही त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांना बसविले. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री आपल्याच पसंतीचा असावा, असाच त्यांचा प्रयत्न होता. जेणेकरुन अंतर्गत दगाफटका होणार नाही. ज्या ठिकाणी जुन्या नेत्यांकडून आव्हान निर्माण होण्याची शक्यता होती, अशा ठिकाणी त्यांनी शह-काटशह देत अशा नेत्यांना दूर ठेवले किंवा या नेत्यांचे राजकारण मोदी असेपर्यंत चालणार नाही, हे मान्य करण्यास त्यांना भाग पाडले.


केंद्रीय स्तरावरही त्यांनी आपल्याच पसंतीच्या नेत्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय चमकले, तर जुने नेत्यांना दूर सारले.
वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांमुळे पक्षाच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त होऊ शकते. तेव्हा त्यांनी अशा सर्व नेत्यांची निवडणूक लढविण्याची शक्यताच धोरणात्मक निणर्याने संपुष्टात आणली. यामुळे नवीन नेत्यांना संधी देत त्यांना मोदींच्या नावावर मैदानात उतरवून त्यांनी विजयीही केले, असे एका पदाधिकाºयाने सांगितले.


मोदी यांनी ज्या प्रचाराला तीर्थ यात्रा म्हटले त्या दरम्यान त्यांनी एक लाख किलोमीटरचा विमान प्रवास केला. त्यात एका दिवसात मोदी यांनी साडेचार हजार किमीपर्यंतची यात्राही करून टाकली. मे महिन्यातील प्रचारात मोदी यांच्या बहुतेक प्रचार सभांच्या वेळी तापमान ४० ते ४६ अंश होते.

Web Title: Since 2014, preparations for Modi's 2019 campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.