पाक सीमेलगत भारत बांधणार १४ हजार बंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:06 AM2018-01-08T01:06:10+5:302018-01-08T01:06:27+5:30

पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणारा गोळीबार व तोफगोळ््यांचा मारा यांपासून सीमाभागात राहणाºया नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळील गावांमध्ये १४ हजार भूमीगत आश्रयस्थळे (बंकर) बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

 14,000 bunkers to be constructed in Pakistan | पाक सीमेलगत भारत बांधणार १४ हजार बंकर

पाक सीमेलगत भारत बांधणार १४ हजार बंकर

Next

जम्मू : पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणारा गोळीबार व तोफगोळ््यांचा मारा यांपासून सीमाभागात राहणाºया नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळील गावांमध्ये १४ हजार भूमीगत आश्रयस्थळे (बंकर) बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पूँछ व राजौरी या दोन जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत ७,२९८ बंकर बांधण्यात येणार आहेत. तर जम्मू, कठुआ व सांबा जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत ७,१६२ भूमीगत बंकर बांधण्यात येतील. भारत व पाकिस्तान दरम्यान ३३२३ किमी लांबीची सीमा आहे. त्यातील जम्मू-काश्मिर भागामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे क्षेत्र ७४० किमी व आंतरराष्ट्रीय सीमेचे क्षेत्र २२१ किमी आहे. गेल्या वर्षी शस्त्रसंधी मोडून पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात ३५ जण ठार झाले होते. त्यामध्ये २३ जवान शहीद व १२ नागरिक ठार झाले होते. सीमेलगत बंकर बांधण्याचा निर्णयाचे भाजपा नेते जुगल किशोर शर्मा यांनी स्वागत केले आहे. जम्मू भागातील सीमेलगत बंकर बांधावेत अशी सीमावर्ती भागातील नागरिकांची मागणी होती. तिची तत्परतेने दखल घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे जुगलकिशोर शर्मा यांनी आभार मानले आहेत.  

Web Title:  14,000 bunkers to be constructed in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.