एक टक्के श्रीमंतांमुळेच १३ लाख मृत्यू; पर्यावरणसंबंधी अहवालाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:17 AM2023-11-23T05:17:00+5:302023-11-23T05:17:55+5:30

कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणसंबंधी अहवालाचा निष्कर्ष

1.3 million deaths due to rich one percent; Conclusion of Environmental Report | एक टक्के श्रीमंतांमुळेच १३ लाख मृत्यू; पर्यावरणसंबंधी अहवालाचा निष्कर्ष

एक टक्के श्रीमंतांमुळेच १३ लाख मृत्यू; पर्यावरणसंबंधी अहवालाचा निष्कर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील एक टक्का सर्वाधिक श्रीमंत लोक एवढे कार्बन उत्सर्जन करीत आहेत, की ते १३ लाख   लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते, असा निष्कर्ष लाभनिरपेक्ष समूह ‘ऑक्सफॅम’ने जारी केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे. जागतिक कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरण यासंबंधीचा हा अहवाल असून, ‘पर्यावरण समानता : ९९ टक्क्यांसाठी एक ग्रह’ असे त्याचे नाव आहे. 

अहवालात म्हटले आहे की, जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांचे कार्बन उत्सर्जन दोन तृतीयांश लोकसंख्येच्या म्हणजेच ५ अब्ज लोकांच्या उत्सर्जनाएवढे आहे. ‘स्टॉकहोम एन्व्हायर्न्मेंट इन्स्टिट्यूट’च्या संशोधनावर आधारित या अहवालात म्हटले आहे की, श्रीमंत लोक प्रचंड प्रमाणात संसाधनांचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे कार्बन उत्सर्जन अन्य लोकांच्या कार्बन उत्सजर्नाच्या तुलनेत प्रचंड अधिक आहे. 

Web Title: 1.3 million deaths due to rich one percent; Conclusion of Environmental Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.