राजस्थानात विवाह समारंभात घुसला ट्रक, 13 जणांचा मृत्यू, 18 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:07 AM2019-02-19T10:07:56+5:302019-02-19T10:11:27+5:30

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे.

13 killed, 18 injured in truck accident in Rajasthan | राजस्थानात विवाह समारंभात घुसला ट्रक, 13 जणांचा मृत्यू, 18 जखमी 

राजस्थानात विवाह समारंभात घुसला ट्रक, 13 जणांचा मृत्यू, 18 जखमी 

Next

प्रतापगड- राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका लग्नाचा समारंभ सुरू होता. त्याचदरम्यान त्या लग्न समारंभात एक ट्रक घुसला. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं तो ट्रक थेट लग्न समारंभात पाहुणे मंडळी उपस्थित असलेल्या ठिकाणी गेला अन् या अपघातात चार लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला.

तर जवळपास 18हून अधिक लोक जखमी आहेत. त्या भागातील सर्कल अधिकारी विजय पाल सिंह संधू म्हणाले, निंबाहेडाहून बांसवाडा येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 113वर ही घटना घडली आहे. या महामार्गावर रामदेव मंदिराजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकवरील चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूलाच सुरू असलेल्या लग्न समारंभात घुसला. या अपघातात चार लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण जखमी आहेत.


संधू म्हणाले, जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अपघातातील मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांपैकी दौलतराम (60), भारत (30), शुभम (5), छोटू (5), दिलीप (11), अर्जुन (15), ईशु (19), रमेश (30) आणि करण (28) यांची ओळख पटली आहे. बिंदोली येथे सुरू असलेला हा लग्न समारंभ रात्रीच्या वेळेस कदाचित ट्रक ड्रायव्हरला दिसला नसावा, त्यामुळेच दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांबरोबर माझी सहवेदना आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतोय, असंही मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले आहेत.
 

Web Title: 13 killed, 18 injured in truck accident in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात