झारखंडमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 12:09 PM2019-06-10T12:09:08+5:302019-06-10T12:29:25+5:30

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी (10 जून) एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.

11 dead and 25 injured after brake of a bus failed on National Highway 2 in Danuwa Ghati | झारखंडमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

झारखंडमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

Next
ठळक मुद्देझारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी एका बसचा भीषण अपघात झाला.अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

हजारीबाग - झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी (10 जून) एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 


बिहारच्या दिशेने बस जात असताना हा भीषण अपघात झाला. लोखंडी रॉडने भरलेला ट्रेलर आणि बसची जोरदार धडक झाली. ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला. पहाटे 3.30 वाजता हो अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमधील सर्व प्रवासी झोपेत होते. हजारीबागचे उपायुक्त रविशंकर शुक्ला यांच्या देखरेखीखाली घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमींना चौपारण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बसमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

 

Web Title: 11 dead and 25 injured after brake of a bus failed on National Highway 2 in Danuwa Ghati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.