पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची थट्टा - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 03:18 PM2018-05-30T15:18:43+5:302018-05-30T15:20:19+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे. 

1 Paisa Cut in Petrol, Diesel Prices Childish - Rahul Gandhi | पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची थट्टा - राहुल गांधी

पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची थट्टा - राहुल गांधी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन याआधीही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात केल्याने राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका केली.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशातील सर्व नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर, महागाई आकाशाला भिडली आहे. असे असताना दर कमी करण्याची ही पद्धत आहे का? असे असेल तर हा अतिशय बालिशपणा आणि जनतेची क्रूर थट्टा आहे.

मागच्या आठवड्यात मी तुम्हाला तेलाचे दर कमी करण्याचे आव्हान दिले होते. मात्र फक्त 1 पैशांनी दर कमी करून तुम्ही ते आव्हान अजून स्वीकारलेले नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.



 

Web Title: 1 Paisa Cut in Petrol, Diesel Prices Childish - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.