रवळजी येथे जि.प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:14 PM2019-01-05T17:14:25+5:302019-01-05T17:15:38+5:30

देसराणे : कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. यावेळी देसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश संपादन केले. शुक्र वारी (दि.४) रवळजी येथील जि. प. प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय जि. प. अध्यक्ष या स्पर्धेचे उदघाटन जि .प. नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने, विस्तार अधिकारी श्रीमती कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले.

ZP at Raveljee In the excitement of the President's Trophy Center level competition | रवळजी येथे जि.प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात

रवळजी येथे जि.प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात

Next
ठळक मुद्देदेसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश

देसराणे : कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. यावेळी देसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश संपादन केले.
शुक्र वारी (दि.४) रवळजी येथील जि. प. प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय जि. प. अध्यक्ष या स्पर्धेचे उदघाटन जि .प. नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने, विस्तार अधिकारी श्रीमती कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले.
वैयिक्तक नृत्य लहान गटात जि.प. प्राथमिक शाळा देसराणे येथील विद्यार्थिनी कावेरी कुवर, वैयक्तिक नृत्य मोठ्या गटात शुभांगी जाधव व धावण्याच्या शर्यतीत रविन्द्र सोनवणे यासर्व विद्यार्थ्यांना प्रथम क्र मांकाचे बक्षिसे देण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. जी. मोरे, शिक्षिक रत्नमाला जगताप, शाम भोये, बिबीलाल बागुल, जी. एस. साठेआदींचे मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्र माप्रसंगी पुनदाई बहुउद्देशिय संस्था, रवळजी व जि. प. नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने श्रीमती कोठावदे, केंद्रप्रमुख पगार, रत्ना निकम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, सदस्य, सरपंच आदींच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माचे सुत्रसंचलन पी. के. अहिरे यांनी केले. (फोटो ०५ देसराणे)

Web Title: ZP at Raveljee In the excitement of the President's Trophy Center level competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.