शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तेरा संशयित तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:40 AM2018-06-12T00:40:13+5:302018-06-12T00:40:13+5:30

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणाऱ्या संशयितांची यादी परिमंडळ-१ मधील पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तयार केली असून, त्यातील १३ जुगार अड्डे चालविणाºयांवर सहा महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे़

Your suspects have been convicted for the crime in the city | शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तेरा संशयित तडीपार

शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तेरा संशयित तडीपार

Next

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणाऱ्या संशयितांची यादी परिमंडळ-१ मधील पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तयार केली असून, त्यातील १३ जुगार अड्डे चालविणाºयांवर सहा महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे़  उपआयुक्त पाटील यांनी परिमंडळ-१ च्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणेनिहाय जुगार अड्ड्यांवर टाकलेले छापे व छाप्यानंतरही पुन्हा सक्रिय झालेले व छापे टाकून पकडलेल्या जुगार अड्डे चालविणाºया संशयितांची २०१५ ते २०१८ अशी तीन वर्षांची यादी तयार केली़ या माहितीनुसार भद्रकालीतील तेरा जुगार अड्डे चालविणाºयांविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ तडीपार करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सलिम अब्दुल रेहमान पठाण (४७, रा. घ. नं. १२२७, तलवाडी, भद्रकाली) या टोळीप्रमुखासह धर्मा ऊर्फ धर्मराज पुंजाराम सोनवणे (३५, रा. गंगापूर गाव), अशोक ऊर्फ सुभाष तुकाराम महाले (४०, रा. तेलंगवाडी, फुलेनगर, पंचवटी), अहमद अख्तर खान (२८, रा. मिनार मस्जिदसमोर, मुलतानपुरा, भद्रकाली), किशोर रामलाल अहेर (३७, रा. खडकाळी, भद्रकाली), उत्तम वामन वाघ (५०, रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा, भद्रकाली), भारत लक्ष्मण भडांगे (३२, रा. जगतापवाडी, सातपूर), परसराम रामदास आव्हाड (३३, रा. पाटील गल्ली, जुने नाशिक), रियाज अजिज शेख (३२, रा. घ. नं. १३४०, खडकाळी, भद्रकाली), मच्छिंद्र राधाकिसन खांबेकर (४५, रा. बुधवार पेठ, पाण्याचे टाकीजवळ), सचिन शरद इंगोले (२०, रा. जुम्मा मस्जिद, जुने नाशिक), अजिज गणी शेख (४२, रा. घ. नं. २३५५, बडी दर्गा) विष्णू बाबूराव आदमाने (२५, रा. निलगिरी बाग, औरंगाबादरोड) यांचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील अजून नऊ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीची कारवाई सुरू आहे़
पोलीस उपआयुक्तांनी यापूर्वी भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील दोन टोळ्यांच्या हद्दपार प्रस्तावातील ३० संशयितांना शहर व जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते़ गतवर्षी २३, तर चालू वर्षात ५७ अशा ८० सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे़

Web Title: Your suspects have been convicted for the crime in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.