महिला नगरसेवकांना महापालिकेत दुय्यम वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:56 PM2017-11-23T15:56:19+5:302017-11-23T15:57:56+5:30

Women corporators succumbed to corporation | महिला नगरसेवकांना महापालिकेत दुय्यम वागणूक

महिला नगरसेवकांना महापालिकेत दुय्यम वागणूक

Next
ठळक मुद्देउपेक्षा: विधी मंडळ समितीसमोर तक्रारींचा पाऊस

नाशिक- महिला नगरसेवक म्हणून निवडून आलो परंतु अधिकारी जुमानत नाहीत, पुरूष नगरसेवकांचेच ते ऐकतात, महिलांसाठी विश्रांती कक्ष नाही की अन्य सुविधा... अशा प्रकारच्या अनुभवजन्य तक्रारींचा पाऊसच विधी मंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर मांडण्यात आल्याचे समजते.
डॉ. भारती लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरूवारी (दि. २३) महापालिकेस भेट दिली. यावेळी स्थायी समितीच्या दालनात झालेल्या बैठकीस केवळ महिला नगरसेवक आणि अधिकाºयांनाच प्रवेश होता. यावेळी महिला नगरसेवकांनी मनमोकळ्यापध्दतीने मते मांडतानाच पदोपदी येणाºया अनुभवांचे कथन केल्याचे समजते. पुरूष नगरसेवक आणि महिला यांचा दर्जा समान असताना प्रत्यक्षात मात्र पुरूषांना अधिक महत्व दिले जाते. प्रशासनातील अधिकारी महिला नगरसेवकांना अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक देतात. पुरूष मंडळी कोणत्याही प्रकारच्या भाषा वापरून कामे करून घेतात अशी भाषा महिलांना वापरता येत नसल्याने त्यांची कामे रखडतात. अशा तक्रारी त्यांनी केला. महिला नगरसेवकांना दुय्यम वागणूक मिळते. महासभेच्या दिवशी बहुतांशी सर्वच महिला उपस्थिीत असतात. परंतु त्यांच्यासाठी वेगळा विश्रांती कक्ष नाही, त्यामुळे कुठेही एकत्रीत बसता येत नाही अशा तक्रारी करण्यात आल्या. शहरात आणि महापालिकेत असलेली महिलांची स्वच्छता गृह तसेच अन्य समस्या मांडतानाच बचत गटांना कामे देण्यासाठी असलेल्या जाचक अटी तसेच अनेक समस्या देखील मांडल्या.

Web Title: Women corporators succumbed to corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.